आदर्श शिक्षक, लेखक गोकुळ गायकवाड यांना पुत्रशोक डॉ. अविष्कार यांचे अपघाती निधन

0
2227

जामखेड न्युज—–

आदर्श शिक्षक, लेखक गोकुळ गायकवाड यांना पुत्रशोक

डॉ. अविष्कार यांचे अपघाती निधन

आदर्श शिक्षक , विकास मंडळाचे माजी विश्वस्त गोकुळ गायकवाड सर जामखेड यांचा धाकटा मुलगा अविष्कार (सोनू) गोकुळ गायकवाड याचा इस्लामपूर येथे अपघाताने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे गायकवाड कुटुबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

अविष्कार (वय २२) हा बीएएमएस च्या चौथ्या वर्षाला इस्लामपूर येथे शिकत होता. ग्रंथालयातून रविवारी सायंकाळी घरी येत असताना वाहनाने उडवले यात त्यांचा मृत्यू झाला.

गोकुळ गायकवाड हे प्रसिद्ध लेखक कवी व आदर्श शिक्षक म्हणून परिसरात प्रसिद्ध आहेत. तसेच विकास मंडळाचे माजी विश्वस्त आहेत. या घटनेमुळे गायकवाड कुटुबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

गोकुळ गायकवाड यांचा मोठा मुलगा कृषी अधिकारी आहे. तर हा लहान मुलगा बीएएमएस इस्लामपूर येथे शिकत होता. नेमका अपघात कसा झाला याचा शोध पोलीस घेत आहेत.

ही बातमी धक्कादायक आहे .या दुर्दैवी घटनेने गायकवाड कुंटुंबावर फार मोठा आघात आहे. या घटनेतून गोकुळ गायकवाड व परिवाराला सावरण्याची शक्ती ईश्वराने द्यावी हि ईश्वर चरणी प्रार्थना करण्यात आली आहे. अत्यंविधी सायंकाळी 5 वा. अमरधाम जामखेड येथे होईल. असे सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here