जामखेड गौरी सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर, पहा कोण आहेत विजेते
रोहिणी काशिद व संजय काशिद यांच्या वतीने केले होते गौरी महालक्ष्मी सजावट स्पर्धेचे आयोजन
जामखेड शहरात सांस्कृतिक वारसा जोपासला जावा, महिला भगिनींच्या कला गुणांना वाव मिळावा या उदात्त दृष्टीकोनातून महिला शिवजन्मोत्सव समिती जामखेड यांनी गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन केले होते. मंगळवार दि. ३० रोजी छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती पासून भव्य दुर्गाशक्ती वाहन रॅली काढून लोहारदेवी येथे स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
भाजपा शहरमंडलाध्यक्ष संजय काशिद व शिवजन्मोत्सव समिती च्या रोहिणीताई काशिद यांच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. यानुसार गौरी सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी जागतिक कन्या दिनानिमित्त कन्या पुजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय (काका) काशीद यांनी केले यावेळी सुरेखाताई सदाफुले यांनी आपले मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय भाषण प्रांजल ताई कुलकर्णी यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशवराज कोल्हे व मुकुंदराज सातपुते यांनी केले.
गौरी सजावट स्पर्धा 2025 चे विजेते प्रथम क्रमांक आरती सुरज काळे यांना सोन्याची नथ बक्षीस देण्यात आले सौजन्य मोहन ढाळे सराफ द्वितीय क्रमांक प्राजक्ता केशवराज कोल्हे यांना 32 इंची एलइडी टिव्ही सौजन्य विकास अँड एजन्सी, तृतीय क्रमांक छाया लक्ष्मण पोकळे यांना बक्षीस पैठणी त्यानंतर उत्तेजनार्थ बक्षीसे सो सारिका अंगत बोराटे, मीना शहाजी राऊत, कल्पना जगन्नाथ राऊत, सुचिता भास्कर खेत्रे, सुनिता राजेंद्र बोराटे, केशर हिरामण जाधव यांनी पटकावली परीक्षक म्हणून मुकुंदराज सातपुते, संतोष घोलप व संतोष भोंडवे यांनी काम पाहिले.
यावेळी विवेकजी कुलकर्णी, मोहन पवार, मोहन भाऊ ढाळे, डॉ. विठ्ठलराव राळेभात, सुनील काका यादव, अवि दादा बेलेकर, संजय राऊत, प्रवीण होळकर, बाळासाहेब गायकवाड, उमेश फाटे, अजय गौड, विजय गौड, संतोष राऊत, अशोक झगडे, विशाल निमोणकर, आदित्य साळुंखे, दीपक सुरसे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
गौरी गणपतीच्या आकर्षक व सामाजिक सांस्कृतिक परंपरेचे दर्शन, तसेच देशभक्ती जागृती तसेच ग्रामीण जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या सजावटीच्या माध्यमातून महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी भाजपा शहराध्यक्ष जामखेड मंडल संजय (काका) काशिद व सौ. रोहिणी संजय काशिद अध्यक्ष महिला शिवजन्मोत्सव समिती यांनी जामखेड नगरपरिषद हद्दीतील महिलांसाठी गौरी सजावट स्पर्धा आयोजित केली होती.याचे बक्षीस वितरण करण्यात आले.
याप्रसंगी गौरी सजावट स्पर्धेविषयी बोलताना सौ. रोहणी काशिद म्हणाल्या की, मला अभिमान वाटतोय की या माध्यमातून आम्ही महिलांच्या सुप्त गुणांना बाहेर काढुन त्यांचा सन्मान करत आहोत.या स्पर्धेमुळे महिलांचा उत्साह द्विगुणित होत आहे. हे माझ्यासाठी कौटुंबिक स्नेह वाढवणारे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
चौकट भाजपा शहर मंडलाध्यक्ष संजय काशिद तसेच त्यांच्या पत्नी महिला शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षा रोहिणी काशिद हे दाम्पत्य वीस टक्के राजकारण व ऐंशी टक्के समाजकारण करतातसभापती प्रा राम शिंदे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. आपल्या जगदंब प्रतिष्ठान मार्फत विविध सामाजिक उपक्रम ते दरवर्षी राबवितात.परिसरातील मान्यवरांना जामखेड भुषण तसेच विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्यांचा सन्मान,हळदी कुंकू कार्यक्रम, विधवा महिलांचा सन्मान करणे, दुर्गा वाहन रँली (महिला), रक्तदान शिबीर, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान, महिला आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा, गड किल्ले स्वच्छता मोहीम, वढू बुद्रुक येथे दीपोत्सव, मुलींना आत्मनिर्भर बनविण्यासाठी मर्दानी खेळांचे शिबीरे, असे विविध कार्यक्रम सतत सुरू असतात.