Wednesday, March 11, 2026
Home ताज्या बातम्या कडभनवाडी कवडवाडी संपर्क तुटला, लोखंडी पुल खचला

कडभनवाडी कवडवाडी संपर्क तुटला, लोखंडी पुल खचला

0
779

जामखेड न्युज—–

कडभनवाडी कवडवाडी संपर्क तुटला, लोखंडी पुल खचला

जामखेड तालुक्यातील कडभनवाडी व बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील कवडवाडी या दोन्ही वाड्या शेजारी शेजारी आहेत दोन्ही वाड्या मधुन वांजरा नदी वाहते. नदी पात्र खोल आहे. कवडवाडीच्या अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी कडभनवाडी परिसरात व कडभनवाडी च्या अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी कवडवाडी परिसरात आहेत. यामुळे दररोज नदी ओलांडावी लागले.

कडभनवाडी येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लोकवर्गणी करत नदीवर लोखंडी पुल उभारला होता. यामुळे ये जा करणे सोपे झाले होते. पण सततच्या पावसामुळे हा लोखंडी पुल खचला आहे तसेच पत्रा पुर्णपणे वाकला आहे. यामुळे दोन्ही वाड्याचा संपर्क तुटला आहे. शेतकऱ्यांना आपल्या जमिनीत जाता येता येत नाही.

कडभनवाडी ही अहिल्यानगर जिल्ह्यात तर कवडवाडी बीड जिल्ह्यात आहे. दोन्ही वाड्या आपापल्या जिल्ह्यातील शेवटचे टोके आहेत. दोन्ही वाड्या मधुन वांजरा नदी वाहते.

महासांगवी प्रकल्प जुलै महिन्यातच पुर्ण क्षमतेने भरलेला आहे. यामुळे पाण्याचा फुगवटा दोन्ही वाड्या च्या मागे जातो यामुळे दोन्ही वाड्या संपर्क होत नाही.

शेतकरी वर्गाला ये जा करण्यासाठी कडभनवाडी च्या ग्रामस्थांनी लोकवर्गणी करत लोखंडी पुल उभारला होता. यामुळे नदीला पाणी असले तरी लोखंडी पुलावरून ये जा करता येत होती. पण आता लोखंडी पुल खचल्या मुळे दोन्ही वाड्या चा संपर्क तुटला आहे.

लवकरात लवकर शासनाने लोखंडी पुल दुरूस्ती करावा यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांमधुन होत आहे. जेणेकरून दोन्ही वाड्या मध्ये पुन्हा संपर्क होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!