कोरोना रूग्णांवर मोफत उपचार करणार्‍या डॉ. रवी आरोळे व डॉ. शोभा अरोळे यांना शासनाने पद्म पुरस्कार द्यावा – स्वाभिमानी शेतकरी संघटना

0
226
जामखेड प्रतिनिधी 
             जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
   दिड वर्षापासून कोरोना रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्‍या आरोळे कोविड सेंटरचे संचालक डॉ रवी आरोळे व डॉ. शोभा अरोळे या भावंडांना शासनाने पद्म पुरस्कार द्यावा असे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांच्या नेतृत्वाखाली तहसिलदार विशाल नाईकवाडे यांना देण्यात आले.
       स्वाभिमानी शेतकरी पक्ष जामखेड तालुका अध्यक्ष श्री मंगेश दादा आजबे यांच्या नेतृत्वाखाली जामखेडचे  तहसीलदार विशाल नाईकवाडे  यांच्याकडे …पद्म पुरस्कारासाठी डॉक्टर रविदादा आरोळे व शोभाताई आरोळे यांच्या नावाची शिफारस ….राज्य शासन व केंद्र शासन यांच्याकडे करण्याबाबत निवेदन देण्यात आले……..
      निवेदन देताना संदर्भ म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी 8 जुलै रोजी ट्विटरद्वारे जनतेला आव्हान केले होते…. .कोरोना या महामारी मध्ये जामखेड येथील डॉक्टर रवी दादा आरोळे व डॉक्टर शोभाताई आरोळे या भावंडांनी जिवाची पर्वा न करता जामखेड तसेच शेजारील चार जिल्ह्यांमधील शेतकरी, गोरगरीब व सर्व सामान्य कोरोणा रुग्णांना मोफत उपचार केले.उपचार करत असताना त्यांना राहण्याची जेवणाची अतिशय सुंदर अशी व्यवस्था तेही सर्व स्वखर्चाने केली.ग्रामीण आरोग्य प्रकल्प जामखेड या नावाने खूप मोठे आरोग्यसेवा या विषयी काम उभारले असून या दोन्ही भावंडांना पद्म पुरस्काराने सन्मानित करावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी पक्ष जामखेड तालुका अध्यक्ष मंगेश (दादा) आजबे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केली. मागणी करताना शिष्टमंडळात मध्ये उपस्थित जिल्हा अध्यक्ष सुनील लोंढे, तालुका युवक अध्यक्ष राहुल पवार, धामणगाव शाखाध्यक्ष आबा घुमरे, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष कृष्णा डूचे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here