मराठा आरक्षणाला पाठिंबा व सरकारी वकीलाच्याआत्महत्येच्या निषेधार्थ जामखेड वकिल संघाचे कामबंद आंदोलन
राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर झालेला असून गेल्या पाच दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण सुरू आहे. मराठा आरक्षणाला पाठिंबा व सहायक सरकारी वकील कै. विनायक चंदेल यांनी तणावाखाली केलेली आत्महत्या यास कारणीभूत आरोपीस कठोर शिक्षा होणेबाबत आज जामखेड वकील संघाने दिवसभर कामकाज बंद ठेवले होते.
आज दि.०२/०९/२०२५ रोजी सकाळी १०-३० वाजताजामखेड वकील संघाचे अध्यक्ष अँड. श्री. पी. के. राऊत यांचे अध्यक्षतेखाली तातडीची मिटींग घेवुन वरील विषय नं.१ सद्य स्थितीत चालु असलेल्या मुंबई येथील आरक्षण आंदोलनास जामखेड तालुका वकील संघाचा जाहीर पाठींबा देण्यात आलेला आहे.
सद्य स्थितीत मराठा आरक्षण हा विषय संवेदनशिल झालेला असुन सदर आरक्षणा बाबत मराठा समाजाच्या भावना या विचारात घेण्यात याव्यात व मराठा समाजाच्या आरक्षणा बाबतच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचा शासनाने प्रयत्न करून मराठा समाजाच्या उन्नतीच्या मार्गावर आणणे करीता आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवावा
या करीता आज मंगळवार दि. २ रोजी जामखेड वकिल संघाची बैठक घेण्यात आली यातविषय नं.१ मराठा आरक्षणास जाहीर पाठिंबा हाचर्चेसाठी घेण्यात आला व तसा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला.
तसेच विषय नं. २- वडवणी जि.बीड येथील सहा.सरकारी वकील कै. विनायक चंदेल यांच्या आत्महत्याप्रसंगी सारे न्यायविश्व हादरून गेलेले आहे. वकीलांना जर वकीली करत असताना जर अशा प्रकारच्या समस्यांना तोंड दयावे लागत असेल आणि आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर सर्वसामान्य जनतेचे काय,असा मोठा पेच निर्माण झालेला आहे. वरील घटना ही अतिशय निंदणीय असल्यामुळे जामखेड तालुका वकील संघ झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करीत आहे. तसेच वकीलांवर होणारे अन्याया विरुध्द कोठे ना कोठे वाचाफुटावी म्हणुन व लवकरात लवकर अॅडव्होकेट प्रोटेक्शनअॅक्ट अंमलात यावा म्हणुन तसेच वकील बंधुंनाकायदयाचे संरक्षण मिळावे म्हणुन आजचा विषय नं.२ठरावात घेवुन ठराव पारित केला आहे.जामखेड तालुका वकील संघ कै. विनायक चंदेल यांचे कुटूंबियांचे दुःखात सहभागी होवुन न्यायाची मागणी करत आहे व मराठा आरक्षण आंदोलना सोबत राहुन आज मा. न्यायालयातील कामकाजत सहभागी न होणेबाबत सर्वानुमते ठरले आहे.
निवेदनावर जामखेड वकील संघाचे अध्यक्ष अँड राऊत पी. के., उपाध्यक्ष अँड पठाण अमिर ए. सचिव अँड. वाळुंजकर ए. बी. निवेदनावर सूचक म्हणून अँड हर्षल डोके पाटील तर अनुमोदक म्हणून अँड सग्रांम पोले यांच्या सह्या आहेत.