आदर्श फाउंडेशनचे सामाजिक दातृत्व, शहरातील कोर्ट रोडवरील गणपती मंदिराचा साऊंड सिस्टिम भेट

0
363

जामखेड न्युज—–

आदर्श फाउंडेशनचे सामाजिक दातृत्व, शहरातील कोर्ट रोडवरील गणपती मंदिराचा साऊंड सिस्टिम भेट

परिसरातील जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी नेहमीच अग्रेसर असलेले आकाश बाफना आपल्या आदर्श फाउंडेशन च्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवितात. कोर्ट रोडवरील गणपती मंदिराचा साऊंड सिस्टिम भेट आपले सामाजिक दातृत्व सिद्ध केले आहे.

सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश बाफना यांनी जामखेड शहरात नागरिकांचे अनेक प्रश्न, अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतात. दि.२१ ऑगस्ट २०२५ रोजी कोर्ट रोड येथील जागृत श्री गणपती मंदिरात महिला भजनी मंडळाला साऊंड सिस्टीमच्या अभावामुळे अडचण निर्माण होत होती.

हीच बाब लक्षात घेत आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश दिलीप बाफना यांनी तातडीने मंदिराला साऊंड सिस्टीम भेट दिली.

आज या साऊंड सिस्टीमची विधिवत पूजा बाफना यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी यावेळी पांडुरंग माने,शिवकुमार डोंगरे,चेतन राळेभात, समीर शेख,स्वप्निल सोनार, नारायण जाधव,संजय फुटाणे, तुषार बोथरा, रोहित पारख, अशोक हुलगुंडे तसेच कोर्ट रोड परिसरातील नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागरिकांच्या वतीने आकाश बाफना यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या सामाजिक उपक्रमाबद्दल बाफना यांचे ओंकार दळवी यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here