‘लय चुरुचुरु बोलू नकोस’,’भावकीमुळेच निवडून आलास’ काका अजित पवारांचा पुतण्या रोहित पवारांना टोला अजित वरून कठीण दिसत असला, तरी आतून नारळासारखा, आमचा लाडका रोहितही धीट झालाय – सरोज पाटील

0
665

जामखेड न्युज—–

‘लय चुरुचुरु बोलू नकोस’,’भावकीमुळेच निवडून आलास’ काका अजित पवारांचा पुतण्या रोहित पवारांना टोला

अजित वरून कठीण दिसत असला, तरी आतून नारळासारखा, आमचा लाडका रोहितही धीट झालाय – सरोज पाटील

महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चेत असणारे काका-पुतणे, अर्थात अजित पवार आणि रोहित पवार पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर आले आणि त्यांच्यातील राजकीय जुगलबंदीने उपस्थितांना हसवून लोटपोट केले. निमित्त होते इस्लामपूर येथे महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या एका कार्यक्रमाचे, जिथे जयंत पाटीलही उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, “दादा गावकीचा विचार करतात, पण भावकीला विसरले.” रोहित पवारांनी मारलेला हा टोला ऐकून अजित पवारांसह व्यासपीठावरील सर्वांनाच हसू आवरता आले नाही.

रोहित पवारांच्या फटकेबाजीनंतर जेव्हा अजित पवार बोलायला उभे राहिले, तेव्हा त्यांनी तेवढ्याच हजरजबाबीपणे उत्तर दिले. अजितदादा म्हणाले, “मगाशी बोलत असताना रोहित म्हणाला की दादांचं गावकीकडे लक्ष आहे, भावकीकडे लक्ष नाही. अरे, भावकीकडे लक्ष दिलं म्हणून तू आमदार झालास !”

पुढे जयंत पाटील यांच्याकडे पाहून ते म्हणाले, “बॅलेट पेपरवर निवडून आला आहे, जयंत पाटील जरा त्यांना सांगा.” अजित पवारांनी केवळ प्रत्युत्तर देऊनच थांबले नाहीत, तर त्यांनी हसत हसत रोहित पवारांना ‘माझ्या नादाला लागू नका’ असा मिश्किल इशाराही दिला.

सरोज पाटील म्हणाल्या
अजितदादा वरून आक्रमक दिसत असला तरी आतून गोड आहे. वरून कठीण दिसत असला तरी आतून नारळासारखा आहे. ज्या ज्या वेळी आमच्या घरावर संकट आलं त्यावेळी अजित धावून आला, अशा शब्दात कौतुकाची अजित पवार यांच्या आत्या सरोज पाटील माई यांनी दिली. आज (16 ऑगस्ट) इस्लामपूरमध्ये महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन.डी. पाटील विधी महाविद्यालय, श्रीमती सरोज नारायण पाटील (माई) मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्रा. डॉ. एन. डी. पाटील बहुउद्देशीय सभागृहाचा उद्घाटन सोहळा व प्रारंभोत्सव कार्यक्रम दिग्गजांच्या उपस्थितीत झाला.

यावेळी बोलताना सरोज पाटील माई यांनी अजित पवार आणि रोहित पवार यांना कौतुकाची थाप दिली. या कार्यक्रमासाठी कट्टर राजकीय विरोधक एकाच व्यासपीठावर आल्यानंतर आल्याने सरोज माई काय बोलणार? याकडे लक्ष होते. यावेळी माई यांनी अजित पवार यांच्यासह रोहित पवार यांचे सुद्धा कौतुक केलं आणि दोघांच्याही कार्याची दखल घेतली.

रोहित आता चांगलाच धीट झाला आहे

सरोज माई म्हणाल्या की, या मंचावर आणखी एक हिरा उपस्थित आहे तो म्हणजे आमचा लाडका रोहित पवार. रोहित आता चांगलाच धीट झाला आहे. चांगल्या पद्धतीने भाषण देऊ लागला आहे. तो आत प्रा. एन. डी. पाटील यांची जागा घेतो की काय असं वाटतं. अजितदादांविषयी बोलताना माई म्हणाल्या की, अजितदादांची तारीख कोणती घ्यायची असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. या कार्यक्रमासाठी अजितदादा पवार, चंद्रकांत पाटील, लाडके जयंत पाटील कार्यक्रमाला यावेत अशी सगळ्यांची इच्छा होती, पण अजितदादांची तारीख कोण घ्यायची असा प्रश्न सगळ्यांना पडला. त्यानंतर आमचा प्रशांत अजितदादा कडे गेला आणि लगेच दादाने तारीख दिली. अजितदादा वरून आक्रमक दिसत असला तरी आतून गोड आहे. वरून कठीण दिसत असला तरी आतून नारळासारखा आहे, ज्या ज्या वेळी आमच्या घरावर संकट आलं त्यावेळी अजित धावून आला. एन. डी साहेब यांचे निधन झाल्यानंतर त्यांना खांदा देण्यापासून मुखाग्नी देईपर्यंत सर्व जबाबदारी अजितने पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here