सभापती प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपसभापती पदी नंदकुमार गोरे यांची बिनविरोध निवड जामखेड न्युजचा अंदाज तंतोतंत खरा

0
543

जामखेड न्युज—–

सभापती प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपसभापती पदी नंदकुमार गोरे यांची बिनविरोध निवड

जामखेड न्युजचा अंदाज तंतोतंत खरा

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदाच्या निवडीचा कार्यक्रम आज सकाळी आकरा वाजता सुरू झाला भाजपाकडून नंदकुमार गोरे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सतिश शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले भाजपाच्या गटाकडे बारा संचालकाचे बहुमत होते तर विरोधी गटाकडे सहा संचालक असे संचालकांचे पक्षीय बलाबल होते. कालच जामखेड न्युजने प्रकाशित केलेल्या बातमीत उपसभापती नंदकुमार गोरे यांची शक्यता वर्तवली होती ती तंतोतंत खरी ठरली. सव्वा दोन वर्षांपूर्वी ही सभापती व उपसभापती जी नावे वर्तवली होती तीच नावे दोन्ही गटाकडून आलेली होती याच नावातील सभापती व उपसभापती निवड झाल्या होत्या. 

उपसभापती पदाचा निवडणूक कार्यक्रम सुरू झाला परंतु विरोधी गटाचे उमेदवार यांनी वेळेच्या मुदतीत आपला आर्ज मागे घेतल्याने नंदकुमार गोरे यांचा एकमेव अर्ज राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप तिजोरे यांनी नंदकुमार गोरे यांची कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पदी बिनविरोध निवड जाहीर केली.

यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त केला यावेळी नवनिर्वाचित उपसभापती नंदकुमार गोरे म्हणाले की, माननीय सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनखाली कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार पारदर्शक केला जाईल, शेतकरी हिताचे काम करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील तसेच पुढील काळात मार्केट कमिटीचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम सभापती शरद कार्ले व सर्व संचालकांना सोबत घेऊन केले जाईल.

याप्रसंगी उपसभापती नंदकुमार गोरे यांना सभापती शरद कार्ले पंचायत समितीचे माजी सभापती डाॅ.भगवान मुरूमकर, भाजपा तालुकाध्यक्ष बापुराव ढवळे, रवि सुरवसे, संचालक गौतम उतेकर, अंकुशराव ढवळे, नारायण जायभाय, सचिन घुमरे, डॉ गणेश जगताप, राहुल बेदमुथ्था, वैजिनाथ पाटील, विष्णु भोंडवे, सिताराम ससाणे, रविंद्र हुलगुंडे हे सत्ताधारी संचालक व भाजपाचे पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.

तसेच विरोधी गटाचे संचालक सुधीर राळेभात कैलास वराट सौ. रतन चव्हाण, सतिश शिंदे, सुरेश पवार, आनिता शिंदे यांनीही नुतन उपसभापती नंदकुमार गोरे यांना शुभेच्छा दिल्या निवडणुक निर्णय आधिकारी म्हणून दिलीप तिजोरे, तसेच सहायक अधिकारी बाजार समितीचे सचिव वाहेद सय्यद, उपसचिव शिवाजी ढगे यांनी कामकाज पाहिले पांडुरंग उबाळे, गोरख घनवट, डॉ अल्ताफ शेख, अजय सातव, उध्दव हुलगुंडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here