ज्ञानराधा मल्टिस्टेट बंद पडल्याने साकत मध्ये मानसिक धक्याने दोघांचा मृत्यू, आणखी किती बळी घेणार? लवकरात लवकर ठेवी परत मिळाव्यात

0
2360

जामखेड न्युज—–

ज्ञानराधा मल्टिस्टेट बंद पडल्याने साकत मध्ये मानसिक धक्याने दोघांचा मृत्यू, आणखी किती बळी घेणार? 

लवकरात लवकर ठेवी परत मिळाव्यात

 

ज्ञानराधा मल्टिस्टेट गेल्या दिड वर्षापासून बंद आहे. शेकडो लोकांचे कोट्यवधी रुपये पतसंस्थेत अडकलेले आहेत. यामुळे अनेक लोकांना मानसिक धक्के बसत आहेत. यातच अनेकांचे बळी जात आहेत. लवकरात लवकर शासनाने पतसंस्थेची मालमत्ता ताब्यात घेऊन ठेवीदारांच्या ठेवी परत कशा मिळतील हे पाहणे गरजेचे आहे.

जामखेडच्या ज्ञानराधा शाखेत परिसरातील अनेक लोकांच्या ठेवी अडकल्याने ठेवीदार मानसिक तणावाखाली आहेत. अनेक लोकांनी पोटाला चिमटा देत उतारवयात व्याजाच्या पैशावर औषधपाणी व पोटाची गुजराण करण्यासाठी तसेच अनेकांनी मुला मुलींच्या लग्नासाठी ठेवी ठेवल्या होत्या आता पतसंस्था बंद पडल्याने सर्वच ठेवीदार मानसिक तणावाखाली आहेत.

तालुक्यातील साकत येथील मोतीराम वराट यांनी आपली जमीन विकून आलेली सर्व पुंजी म्हणजे 14 लाख रुपये पतसंस्थेत ठेव ठेवली होती. व्याजावर उतारवयात उदरनिर्वाह होईल म्हणून खात्रीने पैसे ठेवले होते. पण दीड वर्षापूर्वी मल्टिस्टेट बंद पडल्याने मोतीराम वराट हे प्रचंड मानसिक तणावाखाली होते. यातच आज सकाळी त्याचे निधन झाले. त्यांनी देहदानाचा संकल्प केला होता. विळद घाटातील विखे पाटील मेडिकल कॉलेज येथे त्यांनी देहदान केले. मोतीराम वराट सारखे अनेक ठेवीदार मानसिक तणावाखाली आहेत.

तसेच श्यामराव मुरूमकर हे मोलमजुरी करणारे गृहस्थ होते. तसेच शेळ्या सांभाळून कुटुंबांचा उदरनिर्वाह करत होते. मोलमजुरी तसेच शेळ्या विकून आलेली पुंजी ज्ञानराधा पतसंस्थेत ठेव म्हणून ठेवली होती सुमारे चार लाख रुपये होते पण पतसंस्था बंद पडल्याने मानसिक तणावाखाली असलेले मुरूमकर यांचे सहा महिन्यांपुर्वी निधन झाले.

‘ज्ञानराधा मल्टी-स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी’च्या ठेवीदारांच्या फसवणूकप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. ११ ठेवीदारांनी दाखल केलेल्या याचिकेतून या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाकडे देऊन ठेवीदारांना तीन महिन्यांच्या आत रक्कम देण्याच्या संदर्भाने आदेश द्यावेत, अशी विनंती केली आहे.


ज्ञानराधाने १३ ते १८ टक्के व्याज दराचे आमिष दाखवून देशभरातील सुमारे सहा लाख लोकांना गुंतवणुकीसाठी आकर्षित केले, परंतु आता सुमारे ३ हजार ५०० कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. अनेक ठेवीदारांचे पैसे अडकून पडले आहेत. आणि त्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणानी संविधानाच्या कलम २१ अंतर्गत ‘सन्मानाने जगण्याच्या’ अधिकाराचे उल्लंघन होत आहे. लवकरात लवकर ठेवी परत मिळाव्यात अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here