जामखेड मध्ये थकबाकी दारांच्या मालमत्तेचा येत्या बुधवारी जाहीर लिलाव पहा कोण आहेत थकबाकीदार व किती आहे थकबाकी

0
3071

जामखेड न्युज—–

जामखेड मध्ये थकबाकी दारांच्या मालमत्तेचा येत्या बुधवारी जाहीर लिलाव

पहा कोण आहेत थकबाकीदार व किती आहे थकबाकी

जामखेड तालुक्यातील काही नागरिकांनी महाराष्ट्र राज्य व इतर महामंडळ यांच्या कडून कर्ज घेतलेले होते त्याची परतफेड करणे आवश्यक होते पण वारंवार नोटीस देऊनही परतफेड झालेली नाही. कर्जदार व जामीनदार यांच्या कडील सुमारे 50,45,366 रूपये रक्कमेच्या वसुलीसाठी त्यांच्या मालमत्तेचा बुधवार दि. २५ जुन २०२५ रोजी लिलाव करण्यात येणार आहे तरी लिलावास नागरिकांनी हजर राहून सर्वोच्च बोलीने सदरची मालमत्ता घेणे कामी जाहीर आव्हान जामखेड चे तहसीलदार गणेश माळी यांनी केले आहे.

जामखेड तालुक्यातील डेप्युटी डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड इनफसमेंट यांचेकडील दंडात्मक आदेशामुळे खालील दर्शविलेल्या तक्त्यातील अ.क्र. १ वरील थकबाकी दाराकडून रक्कम रुपये ३७,५०,०००/- येणे आहे. व महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ अहिल्यानगर यांचे कडुन महामंडळाच्या दिर्घ मुदती कर्ज योजने अंतर्गत खालील अ.क्र. २ ते ६ यांनी नमुद व्यक्तीना विविध व्यवसाया करीता कर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले होते. सदर कर्ज रक्कम 12,95,366 एवढी आहे. हे कर्ज परतफेड करणे आवश्यक होते. परंतु कसूरदार यांनी रक्कम शासन जमा न केल्याने कसुरदार व त्यांचे जामिनदार यांचेकडुन महामंडळाचे येणे थकीत महसुल प्रमाणपत्रानुसार (आर.आर.सी.) वसुली करणेबाबत कळविलेले आहे.

कसुरदार यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड न केलेली रक्कम शासन जमा करणे करीता या कार्यालयाकडुन कसुरदारास मागणीची नोटीस व स्थावर मालमत्ता जप्तीचा आदेश देण्यात आलेले होते. त्यानुसार त्यांच्या मालमत्तवर इतर हक्कात महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे नावाची नोंद घेण्यात आलेली आहे. परंतु, सदरकसुरदार यांनी अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची रक्कम शासन जमा केलेली नाही.

त्यामुळे खालील दर्शविलेल्या थकबाकीदाराच्या नावावर असलेल्या मालमत्तेचा जाहीर लिलाव दि.२५/०६/२०२५ रोजी सकाळी १२.०० वाजता सभागृह तहसिल कार्यालय जामखेड येथे आयोजित करण्यात येणार आहे.

पुढील प्रमाणे थकबाकीदाराचे व जामीनदारांचे नावे आहेत.

त्रिमुर्ती ग्रेप ग्रोव्हर्स को. ऑप. सोसायटी लि. मु.पो.नान्नज ता. जामखेड ३७,५०,०००/-

सावता मारूती मेहेत्रे रा. जामखेड (कर्जदार), तसेच
मारुती बाबुराव मेहेत्रे जामीनदार जामखेड यांच्या कडे ३,१२,२२८/-

प्रविण दत्तात्रय शिंपी रा. अरणगाव कर्जदार तर प्रमीलाबाई दत्तात्रय कल्याणकर जामीनदार यांच्या कडे २,९१,६४९/-

सुमन दत्तात्रय हजारे रा.जामखेड (कर्जदार ) तर
सुग्रीव रामदास गीते रा. मोहरी जामीनदार यांच्या कडे २,६६,११४/-

भैरवनाथ नवनाथ राक्षे रा. धोंडपरगांव (कर्जदार),
सुनिता भैरवनाथ राक्षे रा.धोंडपारगांव (जामिनदार) यांच्या कडे १,२५,८८६/-

राजेंद्र दिनकर मुरूमकर साकत
(कर्जदार) रा. साकत, ता. जामखेड
उज्वला राजेंद्र मुरूमकर व अरुणा कैलास मुरमकर रा.साकत (जामीनदार) यांच्या कडे
२,९९,४८९/-

तरी सदर लिलावात भाग घेणे कामी अनामत रक्कम रुपये ५०००/- भरावे लागेल जी रक्कम लिलाव संपल्यानंतर परत करणेत येईल. लिलाव धारकाने सर्वोच्च बोलीने मालमत्ता घेतल्यानंतर त्या सर्वोच्च बोलीची रक्कम २४ तासांच्या आत चलनाने जमा करावी लागेल. तसेच सर्वोच्च बोली बोलणा-या व्यक्तीने २४ तासाच्या आत सर्वोच्च बोलीची रक्क्म चलनाने सरकार जमा न केल्यास अनामत रक्कम रू.५०००/- ही जप्त करण्यात येईल.

तसेच शासनाची फसवणुक केली म्हणून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच अंतिम लिलाव बोलीनंतर २५% भरणा लगेच करावा लागेल व उर्वरित ७५% रक्कमही ३ दिवसात भरावी लागेल. तरी वरील लिलावास नागरिकांनी हजर राहून सर्वोच्च बोलीने सदरची मालमत्ता घेणे कामी जाहीर आव्हान जामखेड चे तहसीलदार गणेश माळी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here