सावधान—- कर्णकर्कश हॉर्न वाजवणे, फॅन्सी नंबर तसेच नियमबाह्य वाहने जामखेड पोलीसांच्या रडारवर

0
1222

जामखेड न्युज—–
सावधान

कर्णकर्कश हॉर्न वाजवणे, फॅन्सी नंबर तसेच नियमबाह्य वाहने जामखेड पोलीसांच्या रडारवर

नियमानुसार वाहने चालवावीत – पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी

 

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या (fancy number plates आणि कर्णकर्कश आवाज करणारे) तसेच विना लायसन्स वाहने चालवणे आता महागात पडणार आहे कारण हे सर्वांवर आता जामखेड पोलिसांचे लक्ष असणार आहे. या वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. यामुळे नियमबाह्य वाहन चालकांचे धाबे दणाणले आहेत.

जामखेड परिसरात सर्रास ट्रिपल सीट, कर्णकर्कश आवाजाचा हॉर्न, गाड्या रेस करणे, विना परवाना गाडी चालवणे, शाळा काॅलेज परिसरात गाड्या रेस करणे चालू होते. नवनियुक्त पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या ही गोष्ट लक्षात आली. आणी त्यांनी कारवाईला सुरूवात केली आहे.

पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीसांकडून काल बऱ्याच नियमबाह्य गाड्या जप्त करण्यात आल्या. विशेषतः बुलेट मोठ्या आवाजाचा सायलेंसर बसवलेल्या बऱ्याच बुलेट गाड्या जप्त करत जामखेड पोलीस स्टेशनला आणून कागदपत्रे तपासणी करत या वाहनचालकांना दंड ठोठावला आहे या कारवाईचे जामखेड च्या नागरिकांनी कौतुक केले आहे.

आर्थिक दंडाबरोबरच मोठ्या आवाजाचा सायलेंसर काढून गाडी मालकास लहान आवाजाचा सायलेंसर आणून बसविल्या शिवाय गाडीच सोडली नाही. यामुळे नियम तोडणाऱ्या बुलेट धारकांची चांगलीच धावपळ उडाली. दंडही झाला.

तसेच शाळा काॅलेज परिसरात मोकाट फिरणारे तसेच रोड रोमिओ यांच्या वर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे. त्यांचा लवकरच बंदोबस्त करू असे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी सांगितले.

चौकट

सर्वांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, नियमांनुसार वाहने चालवल्यास अपघात आणि वाहतूक कोंडी टाळता येते. त्यामुळे ट्रिपल रायडिंग, डेंजरस ड्रायव्हिंग आणि रेसिंग, अल्पवयीन ड्रायव्हिंग या गोष्टी टाळाव्यात अन्यथा पोलीसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल.

(पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here