Wednesday, February 11, 2026
Home ताज्या बातम्या आत्मीक समाधानासाठी ध्यानधारणा आवश्यक – परमपूज्य श्री. प्रविणऋषिजी

आत्मीक समाधानासाठी ध्यानधारणा आवश्यक – परमपूज्य श्री. प्रविणऋषिजी

0
267

जामखेड न्युज—–

आत्मीक समाधानासाठी ध्यानधारणा आवश्यक – परमपूज्य श्री. प्रविणऋषिजी

जैन समाजातील संत व आदरातिथ्य स्थान असलेले श्री प्रवीणऋषी मा. सा. हे ५१ वर्षापासून समाज प्रबोधनाचे काम संपूर्ण भारतात पायी प्रवास करून करत आहे. त्यांचे १५ हजारपेक्षा जास्त ट्रेनर आहेत. त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत.

जामखेड येथे दि. 12 ते 14 मे असे तीन दिवस त्यांनी गहन ध्यान व गूढ ज्ञानाची अनुभूती सर्व समाजासाठी व्हावी यासाठी शिबीर घेतले. या शिबिराची सांगता बुधवारी झाली. त्यांची मुलाखत घेण्याचा योग आला यावर त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर जात, धर्म, समाज, राजकारण व व्यसनाधीनता यावर आपल्या शैलीत सध्य परिस्थितीवर धार्मिक भाषेत चौफेर टोलेबाजी केली. आत्मीक समाधानासाठी ध्यानधारणा आवश्यक आहे असे मत परमपूज्य श्री. प्रविणऋषिजी यांनी व्यक्त केले.

परमपूज्य श्री प्रविणऋषिजी यांना सध्याच्या समाजव्यवस्थेत बाबत प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले व्यक्ती, परिवार, आणि समाज या तिघांना एका सुत्रामध्ये बांधण्याकरीता आनंद तिर्थाने आरंभ विद्याचे कार्यक्रम संपूर्ण विश्वामध्ये चालू केले आहे. व्यक्ती, संस्था आणि शक्ती संपन्न असावा. परिवारामध्ये स्नेहसंवाद संस्कार असावे. समाज शक्तीशाली व नितीमुल्य जागणारा असावा. माणसाला सिंहासारखे पिंज-यात ओढायचे असेल तर सर्व रस्ते बंद करावे लागतात.

त्याला कानाला धरून आणता येत नाही. रास्ते बंद केले तर तो ठिकाणावर येतो. प्रत्येकाने मेडीटेशन मनापासून केले पाहिजे. त्यामुळे मनाला आत्मिक समाधान, शांती व प्रेरणा मिळते. मेडीटेशन मधून संत ज्ञानेश्वर जगायचा असतो. प्रत्येक व्यक्तीत संत ज्ञानेश्वर असतो पण त्याने आतंकवादीला जगायचे की अहिंसावाद्याला हे ठरवले पाहिजे.

जात व धर्म यावर भाष्य करताना परमपूज्य प्रविणऋषिजी म. सा. यांनी सांगितले.
सध्या एकच जात आहे पैसा आणि सत्ता
कोणतीच जात श्रेष्ठ नाही व कनिष्ठ नाही. मनुष्य हा आपल्या चरित्र्याने श्रेष्ठ बनतो. तो जन्माने श्रेष्ठ बनत नाही ही महावीरांची शिकवण आहे. तुमचे शिल बघा कोठे जन्माला आले, आईवडील कोण आहे यावर काही चारित्र्य बनत नाही. तुम्ही सुशिल बना दुषिल बनू नका. जात, वर्ण, संप्रदाय हे माणसाच्या सावली सारखे पाठीमागे लागले आहे. सावली भयानक होणार नाही यासाठी एक दुस-याचे विचार समजावून घेतले पाहिजे. प्रेम भाव, एक दुस-याचे धर्म मोकळ्या मनाने राहीले तर जात कधीच गोत्यात आणत नाही. ज्यावेळी तुमची जात मोठी तुमची लहान असे सुरू झाले की वेगळा प्रकार सुरू होतो. उदा. माठातील पाणी माठातील नसते ते नदीचे असते. पण माठाने सांगितले हे माझेच पाणी आहे. तेथून जातीयवाद सुरू होतो. पैसा आणि सत्तापासून यापासून मुक्त असेल तर जैन संत आहेत. ते समाजात प्रबोधन आणि प्रशिक्षण देत असताना कधीच प्रबुद्धा (मानधन) दिली जात नाही. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर संत तुकाराम, संत नामदेव, संत सावता माळी, संत गोरोबा कुंभार या संताची बांधणी आहे. त्यामुळे तेथे जातीला थारा नाही व जात चालत नाही.

मोबाईल, व्यसनाधीनने संस्कृतीने परिवार मोडला
——————————
छोटे कुटुंब सुखी कुटूंब हा श्लोगन सरकारने काढला आहे.
माणसाने माणसाशी कसे जगायचे हे कुटुंब शिकवते आणि पण तुमचा मिडीयाने (मोबाईल) कुटूंब व्यवस्था मोडकळीस आणली आहे. जे काम मुघल सत्तेने केले नाही, ख्रिश्चाईने केले नाही, ब्रिटिशांनी केले नाही ते काम तुमच्या मिडीयाने केले नाही. या मिडीयाने सर्व परिवार तोडून टाकला आहे. आराध्य कुटुंबात झोपायच्या अगोदर एकत्र बसतात, प्रार्थना करतात, मोठ्यांना प्रणाम करायचा व लहान्यांना आशीर्वाद द्यायचा यानंतर मोबाईल घरातील वरिष्ठ माणसाकडे जप्त.व्याख्यानाने, प्रवचनाने कोणी व्यसनापासून दूर जात नाही. आपले मुल्य प्रॅक्टीकली शिकवणे हा एकच उपाय आहे. आपल्या मुलांना प्रत्यक्ष जीवनाशी कसा अनुभव आला आहे ते सांगितले पाहिजे. त्यांना कोठे तरी जीवनाचा निर्भेळ आनंदाचा, शुध्द आनंदाचा अनुभव दिला तर ते त्यापासून दूर जातील.

राजकारणाबाबत बोलताना परमपूज्य श्री प्रविणऋषिजी एका वाक्यात म्हणाले, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. शहाण्या माणसाने राजकारणाच्या भानगडीत पडायचे नाही. आण्णा हजारे यांच्या खांद्याचा उपयोग करून अरविंद केजरीवाल सत्तेत पोहचले.
परमपूज्य श्री प्रविणऋषिजी म.सा यांना जामखेड येथे आणून गहनध्यान व गूढ ज्ञानाची अनुभूती घेण्याची संधी सर्व समाजासाठी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष दिलीप गुगळे, जितेंद्र बोरा, प्रतिभा बोरा यांनी उपलब्ध करून दिली. ते पाच महिन्यांपासून प्रयत्न करत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. प्रविणऋषिजी म.सा यांचे जामखेडमध्ये जैन बांधवानी मोठ्या भक्तीमय वातावरणात स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!