भारतीय हॉकी टीमचे फायनल खेळण्याचे स्वप्न भंगले, आता कांस्यपदकाची आशा कायम

0
221
जामखेड न्युज – – – – 
     रिओ ऑलंपिकमध्ये रौप्यपदाचे मानकरी असलेल्या बेल्जियमने भारताचा ५-२ असा पराभव करीत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश करताना भारताचे गोल्ड मेडलचे स्वप्न भंगले. पहिल्या क्वार्टरमध्ये जोरदार लढत देणारी टीम इंडिया शेवटच्या क्वार्टरमध्ये पूर्णपणे दमलेली दिसून येत होती. त्याचा फायदा घेत बेल्जियमने  भारताला पुन्हा सामन्यात परतण्याची संधी मिळू दिली नाही.
सामना सुरू होताच बेल्जियमने जोरदारात सुरुवात करत दुसर्‍या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळविला. लॉर्क लुपर्ट याने कोणतीही चुक न करता बेल्जियमला आघाडी मिळवून दिली. १ गोलने पिछाडीवर पडलेल्या भारताने लगेच शानदार पुर्नरागमन केले. हरमनप्रीतने ७ व्या आणि मनदीपने ८ व्या मिनिटाला बेल्जियमवर गोल करीत २-१ अशी आघाडी घेतली. पहिल्या क्वार्टरचा खेळ संपल. तोपर्यंत भारत २-१ असा आघाडीवर होता. दुसर्‍या क्वार्टरमध्ये बेल्जियम टीमने जोरदार हल्ले सुरु ठेवले. १९ व्या मिनिटाला गोल करीत त्यांनी बरोबरी साधली. दुसरा व तिसर्‍या क्वार्टरमध्ये बरोबरी कायम राहिली. तिसर्‍या क्वार्टरमध्ये भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. परंतु, हरमनप्रीत सिंह ही संधी साधण्यात चुकला आणि येथूनच भारताचा खेळ खालावला.
सामन्याच्या ४९ व्या मिनिटाला बेल्जियमने सामन्यातील तिसरा गोल करीत आघाडी घेतली. बेल्जियमला एका पाठोपाठ तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले. त्यातील एकावर गोल करण्यात बेल्जियम यशस्वी ठरला. चौथ्या क्वॉर्टरमध्ये बेल्जियमने जोरदार चढाया करीत भारतावर वर्चस्व गाजविले. सामन्यातील साडेसात मिनिटे बाकी असताना बेल्जियमला पेनल्टी स्ट्रोक मिळाला आणि बेल्जियमने ४-२ अशी आघाडी वाढविली. त्यानंतरही सामन्यात बरोबरी साधण्यासाठी भारतीय खेळाडू आपला खेळ उंचावू शकले नाही. सामना संपत असताना बेल्जियमने आणखी एक गोल करीत आपली आघाडी ५-२ अशी वाढत सामना जिंकला.
आज दुपारी ऑस्टेलिया आणि जर्मनी यांच्यात दुसरा सेमी फायनल होईल. त्यात विजयी होणारा संघ बेल्जियमबरोबर ५ ऑगस्टला फायनल खेळेल. या दोघांमधील पराभूत संघाबरोबर भारताला ब्रॉन्झ पदकासाठी लढावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here