जामखेड न्युज—–
जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे नियमानुसारच काम होणार अतिक्रमणे निघणार? – उपमुख्यमंत्री अजित पवार
जामखेडच्या प्रलंबित प्रश्नाबाबत महेश निमोणकर यांनी वेधले लक्ष
गेल्या अनेक दिवसांपासून जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्ग रखडलेला आहे. याबाबत संबंधित अधिकारी यांना लवकरात लवकर रिपोर्ट करावयास सांगितले अतिक्रमणे का निघत नाहीत काय अडचण आहे, ठेकेदार का लवकर काम करत नाही यासाठी वेळप्रसंगी मी नितीन गडकरी साहेबांशी बोलेल व लवकरात लवकर रस्ता पुर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे अजित पवार म्हणाले. मी रस्त्यांची कामं करण्यासाठी वेळप्रसंगी लोकांशी वाईटपणा घेतला. काही जणांची घर काढावी लागल्याचे पवार यांनी सांगितले.
जामखेड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते यावेळी माजी आमदार लहू कानडे, युवक प्रदेशाध्यक्ष धीरज शर्मा, जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे, उमेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ, तालुकाध्यक्ष महेश निमोणकर
बाळासाहेब शिंदे, शरद नवले, बाळासाहेब नाहटा राजेंद्र गुंड, प्रशांत शेलार, बापुराव शिंदे, धिरज पाटील, कपील पवार, भगवान पाचपुते, ऋषिकेश शेलार, नंदुरबार मुंडे, सुरज रसाळ, अक्षय शिंदे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अनेक पक्ष प्रवेश झाले
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित अहिल्यानगर जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, जामखेड मध्ये माजी नगरसेवक राजू ओव्हळ, शामीर सय्यद, शिवसेना शहरप्रमुख गणेश काळे, कृष्णा गाडे, अजित रेडे, यांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश झाला.
यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष महेश निमोणकर म्हणाले की, अजित दादा शब्दाला जागणारे नेते आहेत. आज जामखेड पवित्र झाले आहे. मतदारसंघासाठी कुकडीचे पाणी, एमआयडीसी, पाणीपुरवठा योजना याबाबत लक्ष घालावे व कर्जत जामखेड साठी आशिर्वाद हवा असे निमोणकर यांनी सांगितले.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की,
रोहित माझ्यासोबत असताना मी किती कोटींचा निधी दिला याची माहिती घ्या काम करताना उन्हे धुणे काढू नका आपापले काम करा, जनताच आपल्या कामाचे मूल्यमापन करत असते. माझ्या समोर सर्व कार्यकर्ते समान आहेत. मी कधीही भेदभाव करत नाही. मी नेहमीच बेरजेचे राजकारण करतो वजाबाकी चे नाही यावेळी त्यांनी भारतीय हवामान खात्याचा समाचार घेतला पाश्चात्य देश व भारत तुलना केली. पाश्चात्य देशात हवामान खात्याने सांगितले की त्या वेळी पाऊस येतोच भारतात मात्र उलटे होते.
अहिल्यानगरच्या कारखान्यांची काय अवस्था आहे?