अधिकारी व ठेकेदारांच्या संगनमताने जनजीवनच्या कोट्यवधी रुपयांच्या योजना मातीमोल कामाची तात्काळ चौकशी करावी अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर आंदोलन करणार – ॲड. डॉ. अरुण जाधव

0
60

जामखेड न्युज——-

अधिकारी व ठेकेदारांच्या संगनमताने जनजीवनच्या कोट्यवधी रुपयांच्या योजना मातीमोल

कामाची तात्काळ चौकशी करावी अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर आंदोलन करणार – ॲड. डॉ. अरुण जाधव

कर्जत जामखेड तालुक्यातील सर्व गाव व वाडी वस्तीतील जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेच्या कामाची तात्काळ चौकशी करून दोषींवरती तात्काळ कारवाई करण्यात यावी असे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव यांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर यांना देण्यात आले, या कामाचीचौकशी न झाल्यास मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या दालनासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार आहे.

जलजीवन मिशन ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना राबवण्यासाठी कर्जत-जामखेड तालुक्यामध्ये शासनाकडून कोट्यावधी रुपयांची योजना मंजूर करण्यात आली होती, परंतु या योजनेचे काम चालू करताना जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिकारी ठेकेदार, पुढारी यांच्या साखळी पद्धतीने हे काम अगदी निकृष्ट दर्जाचे व कागदावरतीचं करण्यात आले आहे.

ही योजना पूर्ण होऊन एक ते दीड वर्ष झाले तरी देखील मोदी सरकारच्या घोषणेप्रमाणे हर घर… हर नळ!!! याप्रमाणे तालुक्यातील कोणत्याचं गावातील ग्रामस्थांच्या घरी नळ नाही व नळाला पाणीही गेले नाही यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. गरीबाच्या दारामध्ये पाणी पुरवण्यासाठी ही योजना राबवली होती परंतु तसे न होता फक्त ही अधिकारी ठेकेदार आणि पुढार्‍यांच्या घशाला पाणी मिळण्यासाठी योजना राबविण्यात आली होती का? स्थानिक आमदारांच्या जवळचे सर्व ठेकेदार अधिकारी यांनीच या कामाचे टेंडर घेतले आणि त्यांनी अगदी कागदावरतीचं योजना राबवली आहे या योजनेमध्ये पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे पाईप इतर साहित्य वापरण्यात आले आहे.

कोणत्याच गावातील ग्रामपंचायतीना विचारात न घेता मनमानी कारभाराने ही योजना कशीबशी एक दीड फुटापर्यंत पाईप गाढले आहेत काही ठिकाणी तर पुढच्या कडेला आणि मागच्या कडेलाच पाईप गाढले आहेत मध्ये एकही पाईप गाढलेला नाही अशा पद्धतीने ही योजना कागदावरतीचं रंगून घाईगडबडीमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ठेकेदारांना बिल अदा केले आहे, योजना चालू करताना भूजल सर्वेक्षणांनी देखील खोटे दाखले देऊन ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे काम केले आहे, टाटा च्या समितीने देखील जलजीवन मिशन ही योजना उत्कृष्ट दर्जाची झाली आहे असे खोटे दाखले दिलेले आहेत, असे खोटे पूर्णत्वाचे दाखले दिलेच कसे त्या संबंधित टाटा समितीची देखील चौकशी करण्यात यावी व त्यांच्यावर देखील तात्काळ कारवाई करावी.

ही योजना चालू असताना संबंधित गावातील गावकऱ्यांनी पाणीपुरवठा विभागाचे अभियंता, उपअभियंता कनिष्ठ अभियंता व गटविकास अधिकारी यांच्याकडे अनेक वेळेस तोंडी व लेखी तक्रार देखील केलेल्या आहेत कारण ठेकेदार व अधिकारी पुढारी यांची साखळी असल्याने त्यांनी गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच गावकऱ्यांना कोणालाचं विश्वासात न घेता ही योजना निकृष्ट दर्जाची पूर्ण केली आहे, या योजनेची चौकशी केल्याशिवाय संबधी ठेकेदाराचे बील अदा करण्यात येऊ नये असे अनेक गावातील गावकऱ्यांनी प्रशासनास लेखी पत्र दिले असताना देखील संबंधित अधिकाऱ्यांनी घाईगडबडी ठेकेदारांचे संपूर्ण बील आदा केले आहे.

पीडब्ल्यूडीची परवानगी न घेताचं सार्वजनिक रस्त्याच्या मध्यभागातून पाईप गाढले आहेत विहिरीची खोदाई, ट्रायल बोर, रुंदी, मोटर घर, इलेक्ट्रिक मोटर इत्यादी कोणतीचं कामे अंदाज पत्रकारानुसार केलेली नाहीत.

त्यामुळे या योजनेचे काम झाल्यापासून ते आजपर्यंत गावातील योजनेचे पाणी कोणत्याच गावकऱ्यांच्या घरामध्ये गेले नाही मग ही योजना कशाकरिता राबविण्यात आली होती या सर्व कामाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून संबंधित अधिकारी ठेकेदारांवरती कार्यवाही करण्यात यावी व या योजनेचे पाणी प्रत्येक घरामध्ये गेलेचं पाहिजे याकरिता कर्जत जामखेड तालुक्यातील सर्व गावातील गावकऱ्यांसमवेत राज्याचे मुख्यमंत्री यांच्या दालनासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने व ॲड.डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार आहे.

कारण कर्जत जामखेड तालुक्यातील ज्या गावांमध्ये जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे काम झाले आहे त्यागावांना पुढील पन्नास वर्षे पाणीपुरवठा योजनेसाठी शासन स्तरावरून कोणताचं निधी दिला जात नाही यासाठी आत्ता नाही तर परत नाही या घोषवाक्य प्रमाणे गरीबांच्या हक्काच्या व अधिकाराच्या पैशावरती ज्या ठेकेदार,अधिकारी व पुढाऱ्यांनी हजारो कोटी रुपयांवरती डल्ला मारला आहे त्यांना शासनाने कठोरातील कठोर शिक्षा करावी ही असे निवेदनात मागणी केली आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश साठे,ऋषिकेश गायकवाड सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार अधिक कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here