…ही हिंमत मुख्यमंत्र्यांनी दाखवली; शरद पवारांकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक

0
256
जामखेड न्युज – – – 
”मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रावर सातत्याने काहीना काही संकट येत आहेत. एक मोठं अतिवृष्टीचं संकट आलं. हजारो घरं पडली. हजारो घरांमध्ये पाणी शिरलं. होतं नव्हतं ते वाहून गेलं, खराब झालं. पण एक गोष्ट म्हणजे या संकटांवर देखील मात करण्याची हिंमत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवली आणि त्यातून पुनर्विकासाची कामगिरी सुरू झाली.” अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आज जाहीर कौतुक केले. बीबीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी शरद पवार बोलत होते.
शरद पवार म्हणाले, ”एका बाजूने या पूरग्रस्त भागातील घरांची बांधणी करणं हे आव्हान आहे. तर दुसऱ्या बाजूने समस्त कष्टकऱ्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आज मोठं पाऊल पडत आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here