खाजमोद्दीन बाबा दर्ग्याचा उरूस इफ्तार पार्टीने संपन्न

0
195

जामखेड न्युज——

खाजमोद्दीन बाबा दर्ग्याचा उरूस इफ्तार पार्टीने संपन्न

जामखेड शहरातील जुन जामखेड असलेल मोगलपुरा गल्ली या गल्लीत खाजमोद्दीन बाबा दर्गाची दर्गा प्राचीन कालापासून आहे . या दर्ग्याच्या दर्शनासाठी सर्व जाती धर्मातील नागरीक येतात . या दर्ग्याचा उरूस १३ मार्च रोजी सर्व जाती धर्मातील नागरीक मोठया उत्साहाने साजरा करतात . हा दर्गा म्हणजे जामखेड तालुक्यातील राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक आहे.

यावेळी ॲड . एजाज पठाण बोलतांना म्हणाले की मोगलपुरा यंग पार्टीने खजमोद्दीन बाबा दर्ग्याचा उरूस हा रमजान महिन्यात आल्याने कोणताही गाजा वाजा न करता उपवासाची सांगता करून इप्तार पार्टीने साध्या पद्धतीने व शांततेत साजरा करून समाजपुढे एक आदर्श निर्माण केला आहे . त्यांचा आदर्श इतर संघटांनी घेणे हि काळाची गरज आहे .

खाजमोद्दीन बाबा दर्गाच्या उरूस १३ मार्च रोजी होता परंतु हा उरूस रमजान महिन्यात आल्याने मोगलपुरा यंग पार्टीने वेगळा निर्णय घेतला . व इप्तार पार्टीने उरूस साजरा करून एक नवीन आदर्श निर्माण केला.

रमजान महिना हा मुस्लीम बांधवांचा पवित्र महिना असतो या महिन्यात सर्व मुस्लीम बांधव निरंकार उपवास करून नमाज पठन करतात . रमजान महिन्यात १३ मार्च रोजी खाजमोद्दीन बाबा दर्ग्याचा उरूस आल्याने मोगलपुरा यंग पार्टीचे अध्यक्ष आबेद शेख व त्यांचा सदस्यांनी एक मोठा निर्णय घेतला कि रमजान महिन्यात हा उरूस आल्याने बॅन्जो ; ढोलीबाजा ; कवॉली ; मिरवणुक या गोष्टींना फाटा देत यास असंख्य कार्यक्रम रद्द करून उपवासाची सांगता म्हणजे इप्तार पार्टीने करण्याचा निर्णय घेतला व त्याला सर्वांनी दुजोरा दिला.


यावेळी खाजमोदीन बाबा दर्ग्याचा उरूस मोगलपुरा यंग पार्टीने इप्तार पार्टीने मोठ्या उत्साहात व शांततेत साजरा केला.

उरूस निमित्त जे मुस्लीम बांधव उपवास करतात त्यांच्यासाठी दर्ग्या समोर सायंकाळी सात वाजता इप्तार पार्टीचा कार्यक्रम आयोजीत केला या इप्तार पार्टीमध्ये कलिंगद ; खरबुज ; पेंड खजुर ; समोसे ; भेळ ; शरबत असे विविध प्रकारचे पदार्थ आणुन रोजा इप्तार पार्टीचा कार्यक्रम आयोजीत करून मनमुरादपणे सर्व पदार्थाचा आनंद घेऊन मुस्लीम बांधवानी रोजा सोडुन खाजमोद्दीन दर्ग्याला चादर चढवून मोठ्या आनंदान उरूस साजरा केला.

यावेळी मोगलपुरा यंग पार्टीचे अध्यक्ष आबेद शेख ; सल्लागार ॲड एजाज पठाण ; वाजीद पठाण ; समीर शेख ; आयान शेख ; दानिश पठाण ; आर्शद सय्यद ;अरमान शेख ;नुमान शेख ;आयान शेख ; हिदायत शेख ; तैफिक शेख ; अदनान शेख ; अफवान शेख ; आमन खान ; उबेद शेख ; राहील शेख ; शाहादात सय्यद ; साहिल शेख ; अंजर शेख ; आशकान शेख.

आदिनी इप्तार पार्टीमध्ये विशेष परिक्षम घेऊन खाजमोद्दीन बाबा दर्ग्याचा उरूस मोठा गाजा वाजा न करता रमजान महिन्याचे औचित्त साधुन साध्या पद्धधतीने शांततेत साजरा केला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here