नाहुली सेवा संस्थेच्या निवडणुकीत सचिन घुमरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलच्या दहा जागा बिनविरोध छाननी नियमानुसारच – निवडणूक निर्णय अधिकारी

0
364

 

जामखेड न्युज——

नाहुली सेवा संस्थेच्या निवडणुकीत सचिन घुमरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलच्या दहा जागा बिनविरोध

छाननी नियमानुसारच – निवडणूक निर्णय अधिकारी

नाहुली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या नोंदणीनंतर होत असलेल्या पहिल्याच निवडणुकीमध्ये सभापती राम शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन घुमरे व काकासाहेब गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली काल नऊ जागा बिनविरोध आल्या होत्या. आज एका उमेदवाराने माघार घेतल्याने एकुण दहा जागा बिनविरोध झाल्या आहेत. यामुळे आमदार रोहित पवार व संचालक अमोल राळेभात यांना जोरदार धक्का मानला जात आहे.

दाखल अर्जाची छाननी नियमानुसारच झालेली आहे असे निवडणूक निर्णय अधिकारी टेकाळे यांनी सांगितले.

काल छाननी झाली यात नऊ उमेदवारी अर्ज बाद झाले तर आज माघारी घेण्याची मुदत असताना एका उमेदवाराने माघार घेतली यामुळे दहा जागा बिनविरोध झाल्या आहेत. राहिलेल्या जागेसाठी १५ मार्च रोजी निवडणूक होणार आहे.

संस्थेच्या होत असलेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये फॉर्म भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत एकूण 33 अर्ज भरलेले असताना सहकार महर्षी जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांची सर्व यंत्रणा भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस व विद्यमान मार्केट कमिटीचे संचालक सचिन (नाना) घुमरे यांच्या विरोधात उभी असताना देखील अमोल राळेभात यांच्या पॅनलचे नऊ अर्ज छाननी मध्ये बाद होऊन सचिन (नाना) घुमरे व काकासाहेब गर्जे यांच्या पॅनलच्या नऊ जागा बिनविरोध झाल्या होत्या आज एक उमेदवाराने माघार घेतली त्यामुळे दहा जागा बिनविरोध झाल्या आहेत. हा जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांना मोठा धक्का दिला आहे.

नाहूली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेवर विद्यमान मार्केट कमिटीचे संचालक सचिन (नाना) घुमरे व काकासाहेब गर्जे यांचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले आहे. बिनविरोध निवडून आलेले उमेदवार खालील प्रमाणे. नितीन घुमरे, मगन बहिर, बाबुराव बहिर, प्रभाकर बहिर, संदिपान बहिर, दीपक बहिर, अशोक जाधव, राजेंद्र जाधव, बाळासाहेब बहिर, अर्जुन हरी गर्जे असे दहा संचालक बिनविरोध निवडून आले आहेत.

बाद झालेले अर्ज कल्याण जाधव आणि वंदना कल्याण जाधव यांना 4 अपत्य आहेत म्हणून अर्ज बाद झाला आहे. बाळू महादेव बाहिर यांना 3 अपत्य आहेत, अंगद नामदेव बहीर यांना 4 अपत्य आहेत म्हणून हे फॉर्म बाद झाले आहेत तसेच 6 अर्ज संस्थेच्या बिगरकर्जदर सभासदांनी कर्जदार मतदार संघात अर्ज भरला होता म्हणून अर्ज बाद झाले आहेत.

संस्था स्वभांडवलतून कर्ज वाटप करत आहे संस्थे ल अ.नगर जिल्हा सहकारी बँक कडून कर्ज वाटप होत नाही म्हणून संस्था स्वभांडवलातून कर्ज वाटप करत आहे.
NT मधील राळेभात यांच्या उमेदवाराने स्वतः हून अर्ज काढून घेतली 10 बिनविरोध झाल्या आहेत.

याबाबत काल विरोधी पॅनल प्रमुख यांनी पक्षपाती पणाचा आरोप केला होता व न्यायालयात आव्हान देण्याचे जाहीर केले होते.

चौकट
नाहुली सेवा संस्था निवडणूक दाखल अर्जाची छाननी सहकार कायद्यानुसार व राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे महाराष्ट्र यांच्या वेळोवेळी च्या परिपत्रकानुसार व सूचना नुसार झालेली आहे.
,
निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी टेकाळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here