बेताल वक्तव्य करणाऱ्या विकास लवांडे वर गुन्हा दाखल करावा – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
मागील आठवड्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचा प्रदेश प्रवक्ता समाजकंटक विकास लवांडे यांने सत्याग्रही या चॅनलवर संभाजी भिडे गुरुजी विषयी भावना दुखावणारे व कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण करणारे वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्याच्या वर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने जामखेड पोलीसांना निवेदन देत करण्यात आली आहे.
विकास लवांडे याने शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक आणि लाखो शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेले परमपुजनीय आदरणीय श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांचे विषयी व श्री शिवछत्रपती प्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दुर्गांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी जाणाऱ्या दुर्गप्रेमी धारकऱ्यांविषयी अतिशय बिनबुडाचे वक्तव्य करून त्यांची आतंकवाद व आतंकवादयांशी संताप जनक अशी तुलना केलेली आहे. त्यामुळे त्याच्या वर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
त्याने युट्युब चॅनल्स वरती म्हटले आहे की, संभाजी भिडे स्वतःला गुरुजी समजतो त्याने हजारो धारकरी पोरं जी आहेत ज्यांना स्वतःची विवेक बुद्धी वापरता येत नाही अशा धारकाऱ्यांना घेऊन तिथे गडकिल्ले मोहीम वगैरे राबवण्याचा त्यांचा काहीतरी प्रकार असतो गडाचं काहीतरी सांगायचं शिवाजी महाराजांचा अर्धवट काहीतरी चुकीचा इतिहास सांगायचा व त्याची माथी भडकविण्याचा कार्यक्रम करायचा त्यांना एक हिंदू आतंकवादी बनवण्याचा तो एक प्रकार आहे धारकरी हे आतंकवाद यांच्या मोडमध्येच जाणारे असतात ते सद्सद्विवेक विचार करणारे नसतात.
या आशयांचे संतापजनक क्लिष्टदायक,बिनबुडाचे व अतिशय बेताल असे वक्तव्य करून माननीय शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक आणि लाखो शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेले परमपुजनीय आदरणीय श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांचे विषयी व श्री शिवछत्रपती प्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दुर्गांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी जाणाऱ्या दुर्गप्रेमी धारकऱ्यांविषयी अतिशय बिनबुडाचे वक्तव्य करून त्यांची आतंकवाद व आतंकवादयांशी संताप जनक अशी तुलना केलेली आहे.
हे वक्तव्य मी व माझे असंख्य धारकरी धर्मबंधू यांनी युट्युब वर सत्याग्रही या चॅनल वर पाहिलेली त्यामुळे माझ्या व सर्व धारकरी धर्मबंधूंच्या तसेच हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. हे वक्तव्य करणाऱ्या या शरद पवार गटाच्या तथाकथीत प्रदेश प्रवक्त्यावर आम्हा हिंदू बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या म्हणून भारतीय न्याय संहितेच्या कठोर कलमान्वये गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी ही नम्र विनंती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने करण्यात आली आहे.
निवेदनावर पांडुरंग मधुकर भोसले, गणेश जोशी, प्रदीप टाफरे, शुभम राऊत, सचिन देशमुख, आकाश घागरे, जगन्नाथ म्हेत्रे, दर्शन भोसले, बालाजी मऱ्हाळ, विश्वजित राळेभात यांच्या सह अनेकांच्या सह्या आहेत.