साकत घाटात मार्बलची ट्रक पलटी, ड्रायव्हर गंभीर जखमी

0
2196

जामखेड न्युज———

साकत घाटात मार्बलची ट्रक पलटी, ड्रायव्हर गंभीर जखमी

साकत घाटात सकाळी मार्बलचा ट्रक ब्रेक निकामी झाल्यामुळे घाटात पलटी झाला यात काही प्रमाणात मार्बलचे नुकसान झाले आहे तर ट्रक चालक गंभीर जखमी झाले आहेत. ड्रायव्हर ला ताबडतोब जामखेड येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

आज मंगळवार सकाळी मार्बलचा ट्रक साकत मार्गी जामखेड कडे चालला होता. तीन ट्रक बरोबर होते. एक ट्रक पुढे मधला ट्रक चा ब्रेक फेल झाल्याने ट्रक चालकाने सरळ मोठ्या डोगरावर ट्रक घातला यात ट्रक ची पलटी झाली यात ड्रायव्हर कँबीनमध्ये गुंतला होता. याच वेळी वाल्मिक नेमाने हा जामखेड वरून साकतला चालला होता. नेमाने व मागील ट्रक व पुढील ट्रक च्या चालकांनी कँबीनमधून जखमी ड्रायव्हर ला बाहेर काढले.

ड्रायव्हर हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता ताबडतोब सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना वाल्मिक नेमाने यांनी फोन केला ताबडतोब रुग्णावाहिका घेऊन जखमी ड्रायव्हर ला खाजगी दवाखान्यात दाखल केले.

आज मंगळवार दि.१८/२/२०२५ रोजी सकाळी सात वाजता साकत घाटामध्ये मार्बलची ट्रक पलटी झाली असून ड्रायव्हरला मार लागला आहे घटनेची माहिती निलेश नेमाने यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना दिली असता ताबडतोब त्यांनी गाडी पाठवली आणि जखमीला दवाखान्यात दाखल केले आहे.
त्याचा रक्तस्राव चालू होता यावेळी दीपक भोरे , निलेश नेमाने यांनी मदत केली घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी जामखेड येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शना खाली सरोदे पोलीस करीत आहे.

जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या दोन वर्षापासून खुपच संथगतीने सुरू आहे. त्यामुळे अनेक वाहने साकत मार्गे ये जा करतात. साकत रस्ता अरूंद आहे. लवकरात लवकर रस्ता रूंदीकरण व्हावे व घाट रूंदीकरण व्हावे अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here