प्राथमिक शिक्षक श्री केरू डोखे यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

0
479

जामखेड न्युज——

प्राथमिक शिक्षक श्री केरू डोखे यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

जामखेड तालुक्यात अनेक वर्षे सेवा केलेले व सध्या नेवासा तालुक्यातील कौठा येथील प्राथमिक शिक्षक श्री केरू धोंडीभाऊ डोखे यांना मुंबई दादर येथील पदमभूषण ताराबाई मोडक अध्यापक विद्यालयातील माजी विद्यार्थी संघ यांचे वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


दि १५ फेब्रुवारी २०२५ रोजी गांधी बाल मंदीर हायस्कूल कुर्ला येथे हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता कार्यकमाच्या अध्यक्ष स्थांनी अध्यापक विद्यालयाच्या सेवानिवृत्त शिक्षिका सौ जयश्री ताई घैसास प्रमुख पाहुणे श्री जॉनी रावत (हास्यसम्राट कलाकार मुंबई ) उपस्थित होते.

प्राथमिक शिक्षक श्री डोखे यांना यापूर्वीही अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते रॅमन मॅगेशेस विजेते डॉ रजनीकांत आरोळे यांचे हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला होता १ मे २००८ रोजी पुणे येथील कै द . आ शिंदे प्रतिष्ठाण यांचे तर्फे पुणे विद्यापिठाचे तत्कालीन कुलगुरु डॉ नरेंद्र जाधव यांचे हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.


जामखेड तालुक्यात कार्यरत कालावधीत खांडवी गावात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान हागणदारी मुक्त गाव योजना निर्मल ग्राम स्पर्धा साने गुरुजी स्वच्छ सुंदर शाळा पुरस्कार तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्याचा गौरव पुरस्कार प्रदान
करून देण्यात आला होता.

अहिल्यानगर – नेवासा तालुक्यातील कौठा येथील प्राथमिक शिक्षक श्री केरू धोंडीभाऊ डोखे यांना मुंबई दादर येथील पदमभूषण ताराबाई मोडक अध्यापक विद्यालयातील माजी विद्यार्थी संघ यांचे वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दि १५ फेब्रुवारी २०२५ रोजी गांधी बाल मंदीर हायस्कूल कुर्ला येथे हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला.

कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी अध्यापक विद्यालयाच्या सेवानिवृत्त शिक्षिका सौ जयश्री ताई घैसास प्रमुख पाहुणे श्री जॉनी रावत (हास्यसम्राट कलाकार मुंबई ) उपस्थित होते. प्राथमिक शिक्षक श्री डोखे यांना यापूर्वीही अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते रॅमन मॅगेशेस विजेते डॉ रजनीकांत आरोळे यांचे हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

१ मे २००८ रोजी पुणे येथील कै द आ शिंदे प्रतिष्ठाण यांचे तर्फे पुणे विद्यापिठाचे तत्कालीन कुलगुरु डॉ नरेंद्र जाधव यांचे हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला . जामखेड तालुक्यात कार्यरत कालावधीत खांडवी गावात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान हागणदारी मुक्त गाव योजना निर्मल ग्राम स्पर्धा साने गुरुजी स्वच्छ सुंदर शाळा पुरस्कार तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्याचा गौरव केला गेला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here