प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्ह्याच्या कार्याध्यक्षपदी नारायण राऊत तर जिल्हा उपाध्यक्षपदी नानासाहेब मोरे यांची निवड
शिक्षक नेते तसेच जिल्हा बँकेचे माजी चेअरमन नारायण राऊत यांची अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्याध्यक्षपदी तर जामखेड तालुका अध्यक्ष व आठवड सेवा संस्थेचे व्हाइस चेअरमन नानासाहेब मोरे यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. यामुळे त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दिनांक 16 फेब्रुवारी 2025 रोजी अहिल्यानगर येथे प्राथमिक शिक्षक संघ अहिल्यानगर चे त्रैवार्षिक अधिवेशन राज्याचे नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली तसेच उपनेते रावसाहेब रोहकले प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आबासाहेब जगताप राज्य संपर्क संपर्क प्रमुख संजय कळमकर यांच्या उपस्थितीत पार पडले.
याप्रसंगी अहिल्यानगर जिल्ह्याची जिल्हा कार्यकारिणी निवड करण्यात आली त्यामध्ये जामखेड तालुक्याला या कार्यकारणी मध्ये नारायण राऊत तसेच नानासाहेब मोरे यांच्या निवडीने प्रतिनिधित्व देण्यात आले.
अहिल्यानगर जिल्ह्याच्या कार्याध्यक्षपदी श्री नारायण राऊत यांची तर जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी जामखेड तालुका अध्यक्ष तथा आठवण विविध कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन श्री नानासाहेब मोरे यांची निवड करण्यात आली.
या निवडीमुळे जामखेड तालुक्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे या निवडीमुळे संघाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यास संधी दिल्याचे समाधान संघ कार्यकर्त्यांमध्ये दिसून आले.
या संघ निवडीमध्ये जामखेड तालुक्यातील शिक्षक नेते किसन वराट, केंद्रप्रमुख संघटना राज्य सरचिटणीस राम निकम, अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक संचालक संतोष राऊत, रामहरी बांगर, नवनाथ बहिर, उपेंद्र आढाव, यादव दत्तात्रय, सुनील घुमटकर, राम ढवळे, अरुण मुरूमकर, अभिमान घोडेस्वार, शिवाजी हजारे, नारायण लहाने यांनी अभिनंदन केले आहे.