जामखेड न्युज——
कष्टातून मनगट, संस्कारातून मन व वाचनाने मेंदू बळकट होतो – मा. प्राचार्य श्रीराम मुरूमकर
श्री साकेश्वर विद्यालयात दहावी सदिच्छा निरोप समारंभ व वार्षिक पारितोषिक वितरण संपन्न
कष्टातून मनगट, संस्कारातून मन व वाचनाने मेंदू बळकट होत असतो माणूस संस्कारक्षम होत असतो वाचन ही काळाची गरज आहे. माणसाला अन्न आणि पाण्याची जेवढी गरज असते तेवढीच माणसाला पुस्तकाची गरज असणे आवश्यक आहे.समृद्ध आणि वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ जगण्यासाठी वाचन संस्कार महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन मा. प्राचार्य श्रीराम मुरूमकर यांनी व्यक्त केले.

श्री साकेश्वर विद्यालयात इयत्ता दहावी सदिच्छा निरोप समारंभ व वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य श्रीराम मुरूमकर तर प्रमुख पाहुणे म्हणून जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट होते यावेळी, उपसरपंच राजाभाऊ वराट, ज्ञानदेव मुरूमकर, डॉ. सुशील तांबे, अभिषेक पाटील, मुख्याध्यापक दत्ता काळे, राजकुमार थोरवे, सुदाम वराट, अर्जुन रासकर, त्रिंबक लोळगे, सुलभा लवुळ, सचिन वराट, मुकुंद वराट, प्रसाद होशिंग, विजय हराळे, अतुल दळवी, आण्णा विटकर, जालिंदर घोडेस्वार, आश्रू सरोदे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी तालुक्यात दहावी मार्च 2024 मध्ये प्रथम क्रमांक शिवरत्न कैलास वराट, गणित विज्ञान विषयात तालुक्यात प्रथम क्रमांक लक्ष्मी लहू वराट तसेच इयत्ता दहावीतील विद्यार्थी व ज्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दक्षिण आशियायी टेनिस क्रिकेट स्पर्धेत तो एप्रिल महिन्यात नेपाळमध्ये खेळणारा शुभम घोडेस्वार यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, प्रचंड इच्छाशक्ती अंगी असेल व कष्ट करण्याची तयारी असेल तर परिस्थिती आडवी येत नाही. नेहमी सकारात्मक विचार हवेत. ज्ञान ही अशी संपत्ती आहे ती कोणीही लुटून नेऊ शकत नाही.
यावेळी दिक्षा मोरे, प्रज्ञा मुरूमकर प्रियंका डोके, समृद्धी वराट, ऋतुजा वराट, शुभम घोडेस्वार, लक्ष्मी वराट या विद्यार्थ्यांनी आपले मनोगते व्यक्त केली तर प्रमुख पाहुणे म्हणून कैलास वराट, डॉ. सुशील तांबे, ज्ञानदेव मुरूमकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रस्तावित मुख्याध्यापक दत्ता काळे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन रासकर व सुदाम वराट यांनी केले तर आभार राजकुमार थोरवे यांनी मानले.