साकत येथे विविध मान्यवरांच्या हस्ते उद्या स्मशानभूमीतील वृक्षांचा वाढदिवस राम मुरूमकर यांनी वृक्षारोपण व संवर्धनातून स्मशानभूमीचा केला कायापालट

0
324

जामखेड न्युज——

साकत येथे विविध मान्यवरांच्या हस्ते उद्या स्मशानभूमीतील वृक्षांचा वाढदिवस

राम मुरूमकर यांनी वृक्षारोपण व संवर्धनातून स्मशानभूमीचा केला कायापालट

साकत येथे सेवानिवृत्त वन कर्मचारी राम मुरूमकर यांनी स्मशानभूमीत शेकडो झाडे लावून त्यांचे संवर्धन केले तसेच लोकसहभागातून संरक्षणासाठी कंपाऊंड केले यामुळे स्मशानभूमीचा कायापालट झाला आहे. उद्या बुधवारी दि. 1 जानेवारी रोजी वृक्षाचा वाढदिवस व नवीन 64 फळझाडे व फुलझाडे लागवड विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तरी साकत परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

तहसीलदार गणेश माळी, सहाय्यक वनसंरक्षक राहुरी गणेश मिसाळ, पोलीस निरीक्षक महेश पाटील, गटविकास अधिकारी जामखेड शुभम जाधव, कृषी अधिकारी रवींद्र घुले, गटविकास अधिकारी कर्जत शेळके यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 

साकत येथील सामाजिक कार्यकर्ते राम मुरूमकर यांनी स्वतः च्या सेवानिवृत्ती निमित्त साकत येथील स्मशानभूमीत वृक्षारोपण केले. तसेच या झाडांची स्वतः काळजी घेत दरवर्षी वाढदिवस व विविध सण समारंभ यानिमित्त वृक्षारोपण करण्यात येते यामुळे आज स्मशानभूमी परिसरात सुमारे सातशे झाले झालेली आहेत. तसेच स्मशानभूमीची सुधारणा करण्याची संकल्पना भावकीपुढे ठेवली याला निस्वार्थी पणे करत असलेल्या कामाला खुप छान प्रतिसाद मिळाला आणि भावकीतून सुमारे पाच लाख रुपये लोकवर्गणी करून स्मशानभूमीचा कायापालट केला. स्मशानभूमीला तार कंपाऊंड केले व आतमध्ये वृक्षारोपण केले.
राम मुरूमकर हे दरवर्षी वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करतात तसेच दलित वस्ती स्मशानभूमीचे काम हाती घेऊन तेथील लोकांचे मतपरिवर्तन करत याही स्मशानभूमीचा कायापालट केला कंपाऊंड करून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले आहे.

आमदार प्रा. राम शिंदे यांच्या मार्फत दहा लाख रुपये

आमदार प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमातून
सुशोभीकरणासाठी दहा लाख निधी देण्यात आला यामधून स्मशानभूमीत पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आले तसेच भव्य दिव्य अशी कमान उभी करण्यात आली यामुळे साकत येथील स्मशानभूमीचा कायापालट झाला आहे.

 

राम मुरूमकर स्मशानभूमीचा कायापालट करणारे अवलिया

 

राम मुरूमकर हे जानेवारी 21 मध्ये वनविभागातून सेवानिवृत्त झाले आणि त्याच दिवशी गावात वृक्षारोपण व स्मशानभूमीचा कायापालट करण्याचा संकल्प केला यानुसार पाच लाख रुपये लोकसहभाग गोळा केला यातून कंपाऊंड तसेच परिसरात वड, पिंपळ, चिंच, आंबा, फुलझाडे लावली. या स्मशानभूमीचा कायापालट तर झालाच दलित वस्ती येथे असलेल्या स्मशानभूमीचा कायापालट केला यामुळे स्मशानभूमीचा कायापालट करणारा अवलिया राम मुरूमकर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here