सभापती प्रा. राम शिंदे भविष्यात राज्याचे नेतृत्व करतील – आकाश बाफना सभापती प्रा. राम शिंदे व दिलीप बाफना यांचा बाफना मित्रमंडळच्या वतीने सत्कार संपन्न

0
587

जामखेड न्युज——

सभापती प्रा. राम शिंदे भविष्यात राज्याचे नेतृत्व करतील – आकाश बाफना

सभापती प्रा. राम शिंदे व दिलीप बाफना यांचा बाफना मित्रमंडळच्या वतीने सत्कार संपन्न

प्रा. राम शिंदे यांच्या रूपाने जामखेड तालुक्याला मोठा सन्मान मिळाला आहे. शिंदे साहेब भविष्यात नक्कीच महाराष्ट्राचे नेतृत्व करतील अशी अपेक्षा आकाश बाफना यांनी व्यक्त केली.

प्रा. राम शिंदे यांची विधानपरिषद सभापतीपदी निवड झाल्याबद्दल तसेच दिलीप बाफना यांच्या वाढदिवसानिमित्त बाफना मित्रमंडळच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

यावेळी सभापती प्रा राम शिंदे, दिलीप बाफना, प्रा. मधुकर राळेभात,आकाश बाफना शिवकुमार डोंगरे,
दिगंबर चव्हाण, अमित जाधव, शहरातील व्यापारी , मित्रपरिवार, पत्रकार बंधू व जामखेड शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना दिलीप बाफना म्हणाले की, प्रा राम शिंदे व बाफना परिवाराचे गेल्या पंधरा वर्षापासून स्नेहाचे संबंध आहेत. तसेच शिंदे साहेब यांचे नशिब खुप मोठे आहे. देवेंद्र फडणवीस सारखे मित्र त्यांना मिळाले आहेत.

यावेळी बोलताना प्रा. मधुकर राळेभात म्हणाले की,
प्रा राम शिंदे यांच्या मुळे महाराष्ट्रात कर्जत जामखेड ची मान अभिमानाने उंचावली आहे. सभापती प्रा राम शिंदे व दिलीप बाफना यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here