आमदार रोहित पवारांच्या संकल्पनेतून महिलांची उद्योजकतेच्या दिशेने वाटचाल – २० बचत गटांना २३ लक्ष १२ हजारांच्या धनादेशाचे सुनंदा पवार यांच्या हस्ते वाटप

0
247
जामखेड प्रतिनिधी 
        जामखेड न्युज – – ( सुदाम वराट ) 
         आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून, कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था अंतर्गत, शारदा महिला संघ तसेच ऍग्रो पणनच्या माध्यमातून मतदारसंघातील २० बचत गटांना २३ लाख १२ हजार रुपयांचे धनादेश कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या संचालिका सुनंदा पवार यांच्या हस्ते देण्यात आले. कर्जत तालुक्यातील १५ महिला बचत गटांना १६ लाख तर जामखेड तालुक्यातील ५ बचत गटांना ७ लाख १२ हजार रुपयांचे हे धनादेशआहेत.
      कर्जत येथे भाग्यतारा मंगल कार्यालय तर जामखेड येथे कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. महिला सक्षमीकरणासाठी कायम पुढे असलेल्या सुनंदा पवार यांनी बचत गटांच्या माध्यमातून अनेक कुटुंबे आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.आता ‘गाव तिथे महिला उद्योजक’ ही संकल्पना प्रभावीपणे राबवण्यात येत असुन आ. रोहित पवार हे देखील कटाक्षाने लक्ष घालत आहेत. ‘बचत गटांच्या माध्यमातून महिला शेळीपालन, कुक्कुट पालन, पत्रावळी, द्रोण, दुग्ध व्यवसाय, कागदी पाकिटे, पोस्टकार्ड आदी व्यवसाय प्रभावीपणे करणार आहेत.
      यावेळी सुनंदा पवार म्हणाल्या,कर्जत जामखेडच्या ५०० बचत गटातुन ५००० महिला जोडल्या गेल्या आहेत. त्यात समृद्ध गाव संकल्पच्या महिलांचाही समावेश आहे. या सर्व महिलांना एकत्र करून ‘उमेद’ या संस्थेच्या आधारे सरकारशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.त्यामुळे शासकीय योजनांचाही फायदा संबंधित गटांना होणार आहे.पणनचा अतिरिक्त फायदा देखील बचत गटांना होणार आहे.महिलांची बचत यामध्ये सुरक्षित राहील आणि सभासदत्व काढल्यानंतर मागाल तेंव्हा तुमची बचत सुरक्षित परत दिली जाईल.ज्या गावात १२ ते १५ बचत गट असतील तर त्या ठिकाणी ‘ग्रामसंघ’ तयार करण्यात येणार आहेत आणि मार्गदर्शन करण्यासाठी त्या गावात कार्यालय देखील असणार आहे.
       यावेळी बचत गटांच्या माध्यमातून कर्ज घेतलेल्या महिलांनी आपली मनोगते व्यक्त केली.या कर्जाच्या माध्यमातून यशस्वी व्यवसाय उभारणीचा विश्वास महिलांनी व्यक्त केला.
       कर्जत येथे पार पडलेल्या कार्यक्रमासाठी सभापती मनीषा जाधव,राष्ट्रवादी महिला शहाराध्यक्षा मनीषा सोनमाळी,मोहिनी घुले,डॉ. शबनम इनामदार,तर जामखेड येथे पार पडलेल्या कार्यक्रमासाठी पंचायत समितीच्या सभापती राजश्री मोरे उपस्थित होत्या.
   कार्यक्रमाचे प्रास्ताविक शारदा महिला संघाचे प्रमुख बाळासाहेब नगरे यांनी तर आभार बचत गट समन्वयक रंजना पवार यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here