Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या महिलांविषयी अश्लिल भाषेत बोलणारे भाजपा नेते पाशाभाई पटेल च्या फोटो काळे फासत...

महिलांविषयी अश्लिल भाषेत बोलणारे भाजपा नेते पाशाभाई पटेल च्या फोटो काळे फासत चपलानी मारले जामखेड मध्ये हजारो महिला पाशा पटेल वर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशन समोर ठाण मांडून

0
5133

जामखेड न्युज——

महिलांविषयी अश्लिल भाषेत बोलणारे भाजपा नेते पाशाभाई पटेल च्या फोटो काळे फासत चपलानी मारले

जामखेड मध्ये हजारो महिला पाशा पटेल वर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशन समोर ठाण मांडून

 

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात आमदार प्रा. राम शिंदे यांच्या प्रचारासाठी गुरूवारी सायंकाळी जामखेड येथे सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी भाजपा नेते पाशाभाई पटेल यांनी अश्लिल हावभाव करत महिलांविषयी अर्वाच्य भाषेत बोलले यामुळे जामखेड शहरातील हजारो महिला पोलीस स्टेशन समोर जमल्या व पाशा पटेल याच्या फोटो ला काळे फासले व चपलानी मारले तसेच जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असा पवित्रा घेतला.

आमदार प्रा. राम शिंदे यांच्या प्रचार सभेत पाशा पटेल यांनी अश्लिल हावभाव करत तसेच अश्लिल भाषेत महिलांविषयी अर्वाच्य भाषेत हावभाव करत अवमान केला यामुळे जामखेड मधील महिला खुपच आक्रमक झाल्या होत्या.

अर्चना राळेभात, राजश्री मोरे, शिंदे मँडम, जयश्री वाळुंजकर, सम्रिन कुरेशी, सुनिता कोल्हे, सारिका चव्हाण, सारिका काळे, आशाबाई वीर, रोहिणी टकले, कुंदा गुळवे, सुनिता कांबळे, शोभा सुरवसे, सारिका गोरे, प्रिया राळेभात, सुनिता पोकळे, रेणुका साठे, वंदना शिंदे, स्वाती पोकळे, अलका गोरे, शहेबाज सय्यद, मंदा रसाळ, मुस्कान सय्यद, बिलकीस शेख, सना शेख, रजिया शेख, शेख अमिन, जीया शेख, बेबी शेख, सलिमा पठाण, सुलताना शेख, सुलताना शेख, शबाना शेख यांच्या सह हजारो महिला उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना अर्चनाताई राळेभात म्हणाल्या की, राम शिंदे यांच्या प्रचार सभेत चार प्राध्यापक व्यासपीठावर होते त्यांना काहीच कसे वाटले नाही. राम शिंदे यांनी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवावी असले अश्लिल हावभाव करणारे बोलणारे वाचाळवीर यांचा आम्ही महिला निषेध करतो शासनाने आपल्या जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर ठेवले आहे. अहिल्यादेवी च्या पावण भूमीत महिलांविषयी अर्वाच्य भाषेत बोलले जात आहे. याचा आम्ही सर्व महिला निषेध करतो व जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही.

शासनाने लाडकी बहिण यासाठी आणली आणि त्यांचे नेते महिलांविषयी अर्वाच्य भाषेत बोलत आहेत. यासाठीच लाडकी बहिण आणली का ❓असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला.

चौकट
जामखेड तालुक्यातील चौंडी येथे कर्नाटक चे मुख्यमंत्री तसेच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे आलेले होते तेव्हा पोलीस निरीक्षक चौंडी येथे होते त्यामुळे गुन्हा दाखल होण्यासाठी वेळ लागणार म्हणून महिला आक्रमक झाल्या होत्या तेव्हा उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत वरून जामखेड ला निघाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!