आदराने वर्गणी मागितली कोणाच्या जमिनी बळकावल्या नाहीत – आमदार प्रा राम शिंदे काकासाहेब गर्जे व कांतीलाल वराट यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश
आदराने वर्गणी मागितली कोणाच्या जमिनी बळकावल्या नाहीत – आमदार प्रा राम शिंदे
काकासाहेब गर्जे व कांतीलाल वराट यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश
मी सालकऱ्याचा मुलगा आहे. मला निवडणूक लपविण्यासाठी पैसे कमी पडले म्हणून आदराने वर्गणी मागितली पण तुमच्या सारख्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या नाहीत. ही लढाई जनशक्ती विरूद्ध धनशक्ती अशी आहे. असे आमदार प्रा राम शिंदे यांनी सांगितले.
आयोजित प्रचार सभेत आमदार प्रा राम शिंदे बोलत होते यावेळी नरेंद्र पाटील, शेतकरी नेते पाशाभाई पटेल, प्रा. मधुकर राळेभात, प्रा. सचिन गायवळ, अँड. कैलास शेवाळे, काकासाहेब तापकीर, राजेंद्र गुंड, अंबादास पिसाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, अजय काशिद, संजय काशिद, डॉ. भगवानराव मुरूमकर, सोमनाथ राळेभात, महेश निमोणकर, अमित चिंतामणी, पवन राळेभात, सचिन घुमरे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने, सुनिल साळवे, संतोष गव्हाळे, प्रविण चोरडिया, रवी सुरवसे, मनोज कुलकर्णी, गफ्फार पठाण, शाकीर खान, जमीर बारूद, पोपट राळेभात यांच्या सह अनेक मान्यवर नेते व मोठ्या प्रमाणात महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार शिंदे म्हणाले की, ही निवडणूक जनतेने हाती घेतली आहे. समोरच्या उमेद्वाराची चीडचीड होत आहे. आता चिडायचे नाही असे शिंदे यांनी सांगितले.
आता रडापडी करून काही होणार नाही तुम्ही पाच वर्षे आम्हाला खुप त्रास दिला आहे. सध्या रडापडी सुरू आहे. या नाटकाला बळी पडू नका बाहेरच्याला बाहेरच पाठवा ही लढाई जनशक्ती विरूद्ध धनशक्ती अशी आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित चिंतामणी यांनी केले.पाशाभाई पटेल यांनी जोरदार बँटिंग केली यावेळीरवी सुरवसे, सुनील साळवे, डॉ. भगवानराव मुरूमकर, अँड कैलास शेवाळे, प्रा. मधुकर राळेभात, प्रा सचिन गायवळ, शरद कार्ले यांची भाषणे झाली.
काकासाहेब गर्जे, साकतचे माजी सरपंच कांतीलाल वराट सह अनेक गावातील हजारो कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.