जामखेड पुरवठा विभागाच्या कारभाराविरोधात तीव्र आंदोलन छेडणार – सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे पुरवठा विभाग म्हणजे असुन अडचण नसून खोळंबा

0
507

जामखेड न्युज——

जामखेड पुरवठा विभागाच्या कारभाराविरोधात तीव्र आंदोलन छेडणार – सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे

पुरवठा विभाग म्हणजे असुन अडचण नसून खोळंबा

 

जामखेड पुरवठा विभागात मोठ्या प्रमाणावर अनागोंदी कारभार सुरू आहे. साइट बंद आहे. आँनलाईन झाले नाही. अशा कितीतरी तक्रारी नागरिकांच्या आहेत. पुरवठा विभाग म्हणजे असून अडचण व नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरवठा विभागाच्या कारभारात सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी दिला आहे.

जामखेड तहसील कार्यालयात असलेल्या पुरवठा विभागात अनागोंदी कारभार सुरू आहे. या ठिकाणी महिला व जेष्ठ नागरिकांची कुपन ऑनलाईन ची कामे होत नसल्याने नागरीक वैतागले आहेत. परीणामी नागरीकांची ससेहोलपट न थांबल्यास येणाऱ्या काही दिवसात तहसील कार्यालयासमोर जेष्ठ नागरीकांसमवेत धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश दादा आजबे यांनी दिला आहे.

जामखेड येथील पुरवठा विभागात वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक महिला या पुरवठा विभागात हेलपाटे मारून हैराण झाले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून पुरवठा विभागात नविन रेशन कार्ड ऑनलाइन करणे, विवाहित मुलीचे नाव कमी करणे, नवीन विवाहित सुनांचे नाव समाविष्ट करणे, तसेच मयताचे नाव कमी करणे, धान्य मिळवण्यासाठी कुपन ऑनलाईन करणे यासाठी नागरिक पुरवठा विभागात हेलपाटे मारत आहेत. यासर्व गोष्टी ऑनलाइन करण्यासाठी दररोज तहसील कार्यालयातील जेष्ठ नागरिक देखील पुरवठा विभागाचे उंबरठे झिजवत आहेत.

याठिकाणी पुरवठा विभागात सक्षम अधिकारी नसल्याने पुरवठा विभागाचा बोजवारा उडाला आहे. तसेच याठिकाणी शासनाने टेंडर पद्धतीने नेमणूक केलेल्या ऑनलाईन करणारे युवा कर्मचारी हे देखील नागरिकांना अरेरावेची भाषा वापरत आहेत. ज्येष्ठ नागरिकांना अरे तुरेची भाषा वापरतात आहेत,

असं नाव न छापण्याच्या अटीवर ज्येष्ठ
नागरिकांनी बोलताना सांगितले आहे. यासर्व गोष्टींवर मार्ग काढण्यासाठी काल दि 22 रोजी सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे यांनी आवाज उठवला आहे.

या नागरिकांना घेऊन त्यांनी तहसील कार्यालयासमोर या सर्व प्रश्नांबाबत जाब विचारला या ठिकाणी दिलेले सर्व अर्ज अस्ताव्यस्त पडलेले असून एक वर्षांपूर्वी दिलेले अर्ज त्याचाही अद्याप शोध लागत नाही यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत.

 

या पुरवठा विभागात येणाऱ्या जेष्ठ नागरिक व सर्वसामान्य नागरिकांची जर ससे हेलपट थांबली नाही तर येत्या काही दिवसात तालुक्यातील सर्व जेष्ठ नागरिकांना घेऊन तहसील कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे यांनी दिला आहे. यावेळी त्यांच्या समवेत तालुक्यातील बहुसंख्य नागरिक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here