डॉ. पल्लवी शहाजी वायकरची  सहाय्यक आयुक्त विक्रीकर म्हणून निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महिला ओबीसी प्रवर्गात राज्यात दुसरी

0
1744

जामखेड न्युज——

डॉ. पल्लवी शहाजी वायकरची  सहाय्यक आयुक्त विक्रीकर म्हणून निवड

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महिला ओबीसी प्रवर्गात राज्यात दुसरी

 

जामखेड येथील ल. ना. होशिंग विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक शहाजी वायकर सर यांची मुलगी डॉक्टर पल्लवी वायकर हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2023 परीक्षेत क्लासवन पदी राज्य कर सहाय्यक आयुक्त म्हणून निवड झाली आहे. रात्रीच जाहीर झालेल्या निकालात ती मुलींमधे ओबीसी प्रवर्गात दुसरी तर ओपन प्रवर्गात राज्यात पाचवा क्रमांक पटकावला आहे. तिच्या या घवघवीत यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

डॉक्टर पल्लवी वायकर हिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामखेड येथे माध्यमिक शिक्षण ल. ना. होशिंग विद्यालय जामखेड येथे झाले दहावीच्या परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला होता.

उच्च माध्यमिक शिक्षण अहमदनगर येथील रेसिडेन्सी काॅलेज मध्ये झाले यानंतर तिचा नंतर बीएएमएस साठी टिळक आयुर्वेदिक काॅलेज पुणे येथे लागला वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने स्पर्धा परिक्षेचा अभ्यास केला आणि दुसऱ्याच प्रयत्नात घवघवीत यश संपादन केले आहे.

डॉक्टर पल्लवी वायकर हिचे वडील शहाजी वायकर हे ल. ना. होशिंग विद्यालय जामखेड येथे शिक्षक होते. आता ते सेवानिवृत्त झाले आहेत तर आई जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहे.

वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने स्पर्धा परिक्षेचा अभ्यास सुरू केला 2022 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती याचा निकाल येणे बाकी आहे तर 2023 च्या परीक्षेत राज्य कर सहाय्यक आयुक्त म्हणून क्लास वन अधिकारी म्हणून निवड झाली आहे.

तिने महिला ओबीसी प्रवर्गात राज्यात दुसरा क्रमांक तर ओपन मध्ये पाचवा क्रमांक पटकावला आहे.

तिच्या यशाबद्दल दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धव देशमुख, उपाध्यक्ष अरुण चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, खजिनदार राजेश मोरे सह सर्व संचालक मंडळ व प्राचार्य श्रीकांत होशिंग, रमेश अडसूळ, बी. ए. पारखे, माजी प्राचार्य अनंता खेत्रे, दत्ता काळे, उपमुख्याध्यापक रमेश चौधरी, पर्यवेक्षक पी. टी गायकवाड सह सर्व शिक्षक तसेच सोनेगाव येथील संत कैकाडी महाराज विद्यालयातील माजी विद्यार्थी संघ तसेच मित्रमंडळ, नातेवाईक यांनी अभिनंदन केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here