रामभाऊ बाबू लहाने यांचे अल्पशा आजाराने निधन

0
233

जामखेड प्रतिनिधी 

               जामखेड न्युज – – – –
  तालुक्यातील साकत येथील प्रतिष्ठित नागरिक रामभाऊ बाबू लहाने वय ८६ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. साकत येथे सकाळी दहा वाजता अंत्यविधी करण्यात आला.
            न्यू इंग्लिश स्कूल राजुरी येथिल सहशिक्षक भरत लहाने सरांचे ते वडील होत. त्यांच्या मागे तीन मुले, तीन मुली सर्व विवाहित सुना नातवंडे असा परिवार आहे.
        रामभाऊ लहाने यांना दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार व सर्व संचालक मंडळ, जामखेड महाविद्यालय जामखेड, ल. ना. होशिंग विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल राजुरी, श्री साकेश्वर विद्यालय साकत, भैरवनाथ विद्यालय हळगांव येथील प्राचार्य, मुख्याध्यापक व सर्व स्टाफ तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रा. संजय वराट, सरपंच हनुमंत पाटील, सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण वराट सह वेगवेगळ्या मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here