जामखेड न्युज——
गणेश उगले यांची जामखेड शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख म्हणून निवड
जामखेड शिवसेनेचे तालुका उपप्रमुख गणेश बाळासाहेब उगले यांची आज शिवसेना प्रभारी तालुकाप्रमुख म्हणून निवड करण्यात आली शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट वंदनीय श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री आदरणीय उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशावरुन शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख आमदार सुनिलजी शिंदे विधानसभा संपर्कप्रमुख जगदीश चौधरी यांचे मार्गदर्शनावरुन शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी व विधानसभा प्रमुख जगदीश चौधरी यांनी आज गणेश उगले यांची तालुका प्रमुख म्हणून निवडीचे पत्र दिले. यामुळे गणेश उगले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आज शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, गणेश उगले, शहरप्रमुख गणेश काळे, अल्पसंख्याक प्रमुख नासीर खान, ज्येष्ठ शिवसैनिक मोहन जाधव, विवेक उगले, सुयोग सोनवणे, श्रीकांत चव्हाण, नागराज पाणगावकर, सुहास मदने, अरविंद ठाकरे,
यांच्या सह अनेक शिवसैनिक हजर होते. आज सदस्य नोंदणी अभियान चालू केले बीजेपी मध्ये फक्त तालुका प्रमुख गेले बाकी सर्व पदाधिकारी आज मीटिंगला हजर होते.
अनेक युवकांनी केला शिवसेनेत प्रवेश
जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी व विधानसभा प्रमुख जगदीश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाप्रमुख गणेश उगले, गणेश काळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ओम राजेंद्र सानप, मारुती झुंबर वराट, नामदेव सुरेश तावरे, पवार भारत वसंत, वराट शुभम अशोक यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
जामखेडचे शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद यांनी शिवसेना सोडत भाजपामध्ये नुकताच प्रवेश केला त्यामुळे तालुकाप्रमुख हे पद रिक्त होते आज या पदावर प्रभारी म्हणून गणेश उगले यांची निवड करण्यात आली आहे.
हिंदुत्वाशी व मराठी माणसाशी एक अतुट नात शिवसेना प्रमुखांनी सर्वांशी कुटुंबप्रमुखाप्रमाणे जोडले आहे. म्हणूनच त्यांना हिंदु ह्दय सम्राट म्हणून गौरविले गेले. शिवसेनाज्ञप्रमुखांच्या आशिर्वादाने आज संघटना आपल्या सारख्या कार्यकत्यांच्या बळावर उभी आहे.
८०% समाजकारण व २०% राजकारण करत आज संघटनेची वाटचाल जोमाने सुरुआहे. घरा-घरात व गावा-गावात संघटना उभी करतांना अनेक संकटाना धैर्याने तोंड देत संघटना उभी करुन संघटनेचे कार्य जोमाने चालु आहे.
त्यामुळे संघटना सर्वत्र पोहोचली आहे.आपल्या धगधगत्या हिंदुत्वाचा बाणा हिंदुत्वानी पताका समाजाला युवा शक्तीला संघटनेच्या माध्यमातून यशस्वी रित्या पुढे न्यायची आहे.आई तुळजा भवानीचे आशिर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतील आपण आपल्या पदाच्या माध्यमातून चांगले कार्य करावे हिच सदिच्छा संघटनेची शिस्त व आदेशाचे तंतोतंत पालन करावे.