जामखेड न्युज——
राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत जामखेड महाविद्यालयाच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी.
शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी, बालेवाडी, पुणे येथे नुकत्याच राज्यस्तरीय मैदानी स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये ऋषिकेश राघवेंद्र धनलगडे याने २० वर्ष वयोगटात थाळीफेक या क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक मिळवला आहे. उपेश धनलगडे याने गोळा फेक व गौरव रासणे याने चालणे या क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व खेळांना वाव देण्यासाठी महाविद्यालय नेहमीच प्रयत्न बध्द आहे. आज महाविद्यालयात भव्य खेळाचे मैदान आहे .यामध्ये कबड्डी मैदान, बॉल बॅडमिंटन मैदान, व्हॅली बॉल, थाळीफेक मैदान, गोळा फेक मैदान भव्य असा जिमखाना आहे तसेच इतर खेळाचे साहित्य उपलब्ध आहेत.
महाविद्यालयातील क्रीडा विभाग हा नेहमीच विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव देऊन त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत आहे. असे गौरवोद्गार महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.एम.एल डोंगरे यांनी अभिनंदन करताना काढले आहेत.
या खेळाडूंना महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.डॉ. आण्णा मोहिते हे मार्गदर्शन करीत आहेत.
यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धव बापु देशमुख, उपाध्यक्ष मा. अरुण काका चिंतामणी, सचिव मा. शशिकांत देशमुख, खजिनदार मा. राजेश मोरे सह सर्व संचालक मंडळ व प्राचार्य डॉ. एम. एल. डोंगरे, उपप्राचार्य डॉ. सुनिल नरके यांच्या सह अनेकांनी अभिनंदन केले आहे.