Saturday, February 14, 2026
Home ताज्या बातम्या शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली जगदंब प्रतिष्ठान तर्फे सिंहगडावर स्वच्छता मोहीम...

शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली जगदंब प्रतिष्ठान तर्फे सिंहगडावर स्वच्छता मोहीम गणेश मंडळाचा आदर्श उपक्रम

0
599

जामखेड न्युज——

शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली जगदंब प्रतिष्ठान तर्फे सिंहगडावर स्वच्छता मोहीम

गणेश मंडळाचा आदर्श उपक्रम

 

जामखेड तालुका शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद यांचे जगदंब प्रतिष्ठान नेहमीच सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असते. या वर्षी गणेशोत्सवानिमित डिजे डाँल्बी या अनावश्यक खर्चाला फाटा देत गणेश मंडळाच्या तरूणांनी सिंहगडावर जाऊन स्वच्छता मोहीम राबवली याबद्दल जामखेड परिसरात मंडळाचे कौतुक होत आहे.

 

जगदंब प्रतिष्ठान तरूण मंडळाने गणेशोत्सवानिमित सिंहगडावर जाऊन गडावरील कोंढाणेश्र्वर मंदिर, देव टाक, अमृतेश्वर मंदिर तसेच कल्याण दरवाजा तटबंदी, हत्ती तलाव, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मारकाच्या आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, विहिरीतील कचरा, तटबंदी भिंतीवरील गवत काढणे इत्यादी स्वच्छता केली.

 

शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली जगदंब प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष किशोर काळे, संग्राम मते, विशाल निमोणकर, उमेश जाधव, चैतन्य धाडगे, ओम घोरपडे, बाळू उबाळे, एस गिरमे, आदित्य साळुंखे,
प्रथमेश झगडे, अनुप झगडे, अनिकेत झगडे, कृष्णा राऊत, ऋषिकेश राऊत, ऋषिकेश झगडे, बंटी अत्रे
बाळू निमोणकर, विकी ससाने, भारत पवार,सार्थक जाधव, पृथ्वीराज निमोणकर, आयुष बोडके, रुद्रा काशीद, आदित्य जगताप, दीपक सुरसे, तेजस म्हेत्रे
तुषार फुलमाळी, तुषार जगदाळे, माधव किल्मिसे,
समर्थ जगताप, नमो शेख, रवी विधाते, अमर विधाते, नाना गिरमे, ऋषिकेश यादव, विराज गिरमे
यांच्या सह अनेक तरुण उपस्थित होते.

 

छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रत्येक किल्ला म्हणजे पराक्रम, शौर्य, शिस्तीचा इतिहास सांगणारा आहे, परंतु पर्यटकांमुळे किल्ल्यांवर अस्वस्थतेचे साम्राज्य निर्माण होत आहे. या वास्तूचे पावित्र्य राखले जावे, तसेच तेथील ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जोपासला जावा या उद्देशाने ही स्वच्छता मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते.

 

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी होत असते, शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले सिंहगडवर देखील मोठ्या उत्साहात शिवजयंतीचा आनंदोत्सव साजरा केला जातो. तत्पूर्वी किल्ल्याची स्वच्छता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!