जामखेड न्युज——
ज्ञानराधा पतसंस्थेतील ठेवीदारांच्या न्याय हक्कासाठी शनिवारी जामखेड मध्ये रास्ता रोको करणार – सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे
कुटे त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने कारवाई होत नाही का❓
ज्ञानराधा को – आँप क्रेडीट सोसायटीवर प्रशासनाने कारवाई करावी तसेच दोन महिने गुन्हा दाखल होऊनही अद्याप गुन्हा वर्ग झाला नाही तो वर्ग करावा व ठेवीदारांना न्याय द्यावा अन्यथा अन्यथा शनिवारी सर्व ठेवीदारांसह खर्डा चौक जामखेड येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी दिला आहे.
ज्ञानराधा को – आँप क्रेडीट सोसायटी जामखेड शाखेत जामखेड व परिसरातील ६५०० ठेवीदारांचे ९० कोटी रुपये रूपये ठेव आहेत. त्या लवकरात लवकर मिळाव्यात अशी मागणी ठेवीदारांच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे. तसेच दोन महिन्यांपूर्वी ज्ञानराधा पतसंस्थेवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र अद्याप तो वर्ग करण्यात आला नाही. सुरेश कुटे त्याची पत्नी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला म्हणून कारवाई केली जात नाही का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील म्हणतात की, उपविभागीय पोलीस अधिकारी आजारी आहेत म्हणून गुन्हा वर्ग करण्यात आला नाही तरी ताबडतोब गुन्हा वर्ग करण्यात यावा ठेवीदारांना न्याय द्यावा अन्यथा शनिवारी खर्डा चौक जामखेड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा पोलीस स्टेशनला ठेवीदारांनी दिलेल्या निवेदनात दिला आहे.
सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, प्रमोद राऊत, सुतार सर, डॉ.प्रदीप कात्रजकर, संतोष शिंदे, शिवलिंग राऊत, कुसुम खाडे, अँड महारुद्र नागरगोजे, उदयकुमार दाहितोंडे, पिंन्टू राळेभात, आशा गायकवाड, उज्वला फडतरे, सिंधु शिंदे, मीनाक्षी खरात, विमल राऊत, दीपा दस्तुरे, वच्छला वाळुंजकर, मधुकर जरे यांच्या सह अनेकांच्या निवेदनावर सह्या आहेत.
काही दिवसांपूर्वी नाही जातीसाठी लढा मातीसाठी गरीबांच्या हक्कासाठी असे घोषवाक्य घेऊन हभप अँड. महारुद्र ना गरगोजे जामखेड तहसील कार्यालया समोर विविध मागण्यांसाठी तीन दिवस
उपोषण केले होते. यानंतर ज्ञानराज पतसंस्थेवर गुन्हा दाखल करण्यात आला. तरीही तो वर्ग करण्यात आला नाही प्रशासनाने ताबडतोब पतसंस्थेवर प्रशासक नियुक्त करावा तसेच कुटे त्याच्या संपतीचा लिलाव करून ठेवीदारांचे पैसे परत करावेत अशी मागणी अँड. महारुद्र नागरगोजे यांनी केली तसेच शनिवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे असेही सांगितले.
जामखेड सह विविध ठिकाणी ज्ञानराधा पतसंस्थेच्या संचालक मंडळावर ४२ गुन्हे दाखल झाले आहेत. लवकरात लवकर ठेवीदारांचे पैसे मिळावेत म्हणून आमदार रोहित पवार यांनीही राज्यपाल यांची भेट घेऊन मार्ग काढण्याची विनंती केली होती. तसेच आमदार प्रा. राम शिंदे यांनाही ठेवीदारांनी न्याय मिळावा म्हणून निवेदन दिले आहे. न्याय देण्याचे आश्वासन आमदार शिंदे यांनी दिलेले आहे.