राजकारणातील समाजकिरणी आधुनिक काळातील आरोग्यदुत किरण शिंदे पाटील तब्बल ४१ वेळा रक्तदान करणारा अवलिया !

0
187

जामखेड न्युज——

राजकारणातील समाजकिरणी आधुनिक काळातील आरोग्यदुत किरण शिंदे पाटील

तब्बल ४१ वेळा रक्तदान करणारा अवलिया !

आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण आपापल्या कामानिमित्ताने कामाच्या ठिकाणी नोकरी निमित्त येजा करत असतो . मानवनिर्मित संकटे कधी सांगून येत नाहीत.मानवी प्रगतीबरोबर दुचाकी चारचाकी वाहनांची संख्या वाढली त्यामुळे अपघातांची संख्यासुद्धा जागतिक आकडेवारीनुसार प्रचंड वाढली आहे व ही निश्चितच चिंताजनक आहे.देशात रोज कुठे ना कुठे कोणत्या नाही.

कोणत्या रस्त्यावर अपघात घडतात या अपघातातून वृत्त पाहणाऱ्यांची अपंग होणाऱ्यांची तसेच रक्ता अभावी मृत्यू पडणाऱ्या रुग्णांची संख्या ही लाखोंच्या घरात आहे,अपघात घडल्यानंतर प्रामुख्याने रक्तस्राव मोठ्या प्रमाणावर होतो, रुग्णालयात अत्यवस्थ अवस्थेत रुग्ण दाखल केल्यानंतर प्राधान्याने रक्ताची गरज भासते.

रक्ताचा तुटवडा जाणू नये किंवा एखाद्या रुग्णाला वेळेवर रक्त पुरवठा न मिळाल्याने मृत्यू येऊ नये म्हणून प्रत्येक सरकारी दवाखाने खाजगी दवाखान्यांनी रक्तदान करण्यासाठी जनजागृती केलेली आहे.

 

भारत सरकार रक्तदानाविषयी जनजागृती करण्यासाठी लाखो रुपये खर्च आहे,त्याच धर्तीवर व सामाजिक भान ठेवत झुंजार नेताचे पत्रकार व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती किरण शिंदे पाटील यांनी आजपर्यंत ४१ वेळा विविध रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केले आहे. दरवर्षी दोन वेळा ते स्वैच्छेने व आत्मविश्वासाने रक्तदान करतात व नवरक्तदात्यांना प्रेरणा देतात की रक्तदान केल्याने मानवी आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.

 

तसेच मानसिक भिती घालण्यासाठी ते प्रेरक म्हणून पुढे येत आहेत.रक्तदानाविषयी समाजमनात विविध गैरसमज भिती आहे . रक्तदान केल्याने कोणताही वाईट परिणाम शरीरावर होत नाही किंवा चक्कर येणे, अशक्तपणा जाणवणे असे प्रकार होतात असा समज समाजामध्ये आहे तो चुकीचा आहे.अस किरण शिंदे पाटील हे सांगतात.

आज रक्तदान ही काळाची गरज बनली असून त्या दृष्टीने प्रत्येकाने वर्षातून एकदा रक्तदान केलेच पाहिजे व आपल्या केलेल्या रक्तदानामुळे एका व्यक्तीचा जीव वाचणार आहे त्यामुळे त्या व्यक्तीला एक प्रकारचे जेवण दानच आपल्या रक्तदानामुळे मिळणार आहे त्यामुळे नऊ तरुणांना व नवीन रक्तदान करू इच्छिणाऱ्यांना मी आव्हान करतो की आपण न घाबरता न मानसिक भीती ठेवता रक्तदान करण्यासाठी पुढे यावं व आपल्या सामाजिक जडणघडणीमध्ये आपलाही खारीचा वाटा असावा.

या शुद्ध भावनेने रक्तदान करावे व आपली सामाजिक जबाबदारी, बांधिलकी जपावी व आपल्या देशाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलला असे आवाहन किरण शिंदे पाटील यांनी नवतरुण, नवरक्तदात्यांना केले आहे.यामधुन समाजाविषयी अपार तळमळ,बांधीलकी मानणारा एक आधुनिक आरोग्यदुत सौताडा रामेश्वर नगरी मध्ये जन्माला आल्याचा अभिमान सौताडकरांना वाटणे स्वाभाविक व नैसर्गिक आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने मोठी प्रगती केलेली असली तरी आजही कोणतही विज्ञान तंत्रज्ञान मानवी रक्त निर्मिती करू शकल नाही.

त्यामुळे रक्तदान हे असे गुप्तदान आहे की ते नावाचा कसलाही उल्लेख ना करता केले जाते व ज्या वेळेस रक्त घेणारा रक्त घेतो तेव्हा तो हृदयापासून कृतार्थ होत असेल यामुळे नवतरुणांनी न भिता , मानसिक भिती बाळगता रक्तदान करावे व आपली सामाजिक जबाबदारी,आपली संस्कृती समृद्ध करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here