जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
शेतकरी, नोकरदार व सर्वसामान्य ग्राहकांच्या सोयीसाठी साकत गावात अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचा विस्तार कक्ष सुरू करण्यात यावा म्हणून साकत सेवा संस्थेच्या वतीने जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल राळेभात यांना निवेदन देण्यात आले. त्यांनीही त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरात लवकर साकत गावात जिल्हा सहकारी बँकेची विस्तारीत शाखा सुरू होईल यामुळे शेतकरी, नोकरदार व सर्वसामान्य व्यक्तींची सोय गावातच होणार आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल राळेभात यांना निवेदन देताना साकत सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण वराट, उपाध्यक्ष प्रमोद मुरुमकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रा. संजय वराट, सेवा संस्थेचे संचालक हनुमंत वराट, जयश्री सुरेश वराट, माजी सरपंच कांतीलाल वराट, पोपट वराट, प्रा. युवराज मुरुमकर, युवराज वराट, गणेश वराट, ग्रामपंचायत सदस्य राजू वराट विठ्ठल वराट, महादेव वराट, वसंत वराट, रामकिसन लहाने, भरत लहाने, नासिक लहाने, नितीन सपकाळ, दादा मेंढकर सह अनेकजण उपस्थित होते.
बॅंकेच्या कामासाठी साकत मधील शेतकरी व सर्व सामान्य नागरीकांना जामखेडला जावे लागते छोट्या छोट्या कामांसाठी संपुर्ण दिवस खर्ची जातो गावात जर शाखा झाली तर वेळ व पैशाची बचत होईल. साकत परिसरात दोन सेवा संस्था, दोन ज्युनियर कॉलेज, दोन हायस्कूल आहेत या सर्वांची सोय बॅंकेच्या विस्तारीत शाखेमुळे गावातच होईल.
साकत सेवा संस्था बॅंकेच्या विस्तारीत शाखेसाठी आपली जागा विना भाडेतत्त्वावर देणार आहे त्यामुळे जागेच्या प्रश्न मार्गी लागला आहे.
निवेदन स्वीकारल्यानंतर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल राळेभात यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर साकत गावात जिल्हा सहकारी बँकेची विस्तारीत शाखा सुरू होईल असे आश्वासन दिले. यामुळे साकत परिसरातील बॅंकेच्या ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे.