जामखेड न्युज——
तालुक्यातील अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे करावेत – उपसभापती कैलास वराट
तालुक्यातील बहुतेक ठिकाणी या वर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला आहे यामुळे अनेक शेतकऱ्यांची पीकांचे नुकसान झाले आहे. पिकात पाणी आहे. पीके वाया गेलेले आहेत. त्यामुळे अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांच्या पीकांचे ताबडतोब पंचनामे करावेत व शासनाकडून ताबडतोब मदत मिळावी अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
निवेदन देताना कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक विठ्ठल चव्हाण, संचालक नारायण जायभाय, संचालक गजानन शिंदे, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल वराट, माजी ग्रामपंचायत सदस्य महादेव वराट उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेतातील पिकांचे नुकसान झालेलेआहे. सर्व पिके वाया गेलेले आहेत. तरी तालुक्यातील अतिवृष्टी बाधित सर्व शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे पंचनामे तात्काळ करावेत.
पंचनामे करतांना कोणताही बाधित शेतकरी वंचीत राहु नये व शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतीचे क्षेत्र कमी होऊ नये याबाबत आपल्या स्तरावती दक्षता घेऊन योग्य ती कार्यवाही करावी हि विनंती उपसभापती कैलास वराट यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
तसेच सदर पंचनाम्यामधुन अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहिल्यास व शेतकऱ्यांचे बाधित क्षेत्रकमी लागल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल. असा इशारा कैलास वराट यांनी दिला आहे.
तालुक्यातील सोयाबीन, मुग, उडीद, तूर या पीकांचे अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नगदी पीक हातचे गेल्याने शेतकऱ्यांचा कणाच मोडला आहे. शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. त्यामुळे ताबडतोब पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.