जामखेड न्युज——
स्व. देवराव दिगांबर वराट काॅलेज ऑफ फार्मसी साकत येथे शिक्षकदिन मोठ्या उत्साहात साजरा
आपल्या आई-वडिलांनंतर कोणी गुरु असेल तर ते आपले शिक्षक असतात. आपल्या जीवनातील पंधरा-सोळा वर्ष आपण शिक्षणासाठी खर्च करतो. या वर्षात आपल्या आई-वडिलांना व्यतिरिक्त शिक्षकांकडून आपल्याला मार्गदर्शन मिळते. त्या शिक्षकांचा हा दिवस म्हणजे शिक्षक दिनदिन होय असे मत प्राचार्य गोरक्ष बारगजे यांनी सांगितले.
स्व. देवराव दिगांबर वराट काॅलेज ऑफ फार्मसी साकत येथे शिक्षकदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्राचार्य गोरक्ष बारगजे, रमेश डिसले, किरण सानप, कैलास माने, कांचन बडे, सना सय्यद, वैष्णवी मुरूमकर, कृष्णा पुलवळे, अशोक नेमाने यांच्या सह अनेक मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्राचार्य बारगजे म्हणाले की,
डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस 5 सप्टेंबरला भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा दिवस साजरा केला जातो.
या दिवशी देशभरातील विविध राज्यातील शिक्षकांना राष्ट्रपतींकडून आदर्श शिक्षक असा पुरस्कारही मिळतो. अशा या महत्त्वाची भूमिका पार पाडण्याचे शिक्षकांना तुम्ही काही शुभेच्छा देऊन त्यांचा दिवस खास बनवू शकता तसेच जीवनात सर्व विद्यार्थ्यांना जीवन जगत असताना गुरूंचे महत्त्व काय आहे या बद्दल मार्गदर्शन केले.
संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून श्री.साकेश्वर सायन्स ज्युनियर कॉलेज साकत व जय हनुमानमाध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोल्हेवाडी यानंतर आता फार्मसी च्या रूपाने नवीन कोर्सला सुरू झाल्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाची संधी वराट बंधूंनी उपलब्ध करून दिली आहे.