नगरविकास विभागाची तज्ज्ञ समिती समोर जामखेड प्रारूप विकास आराखड्याविरोधात दोन दिवसांत ४६५ हरकतींवर सुनावणी

0
440

जामखेड न्युज——

नगरविकास विभागाची तज्ज्ञ समिती समोर जामखेड प्रारूप विकास आराखड्याविरोधात दोन दिवसांत ४६५ हरकतींवर सुनावणी

 

जामखेड शहर प्रारूप विकास आराखड्याला जामखेडकरांनी विरोध दर्शवून बुधवारी (दि.२८) व गुरुवारी (दि. २९) गठित नियोजन समितीसमोर एकूण ४६५ हरकती दाखल केल्या आहेत. समितीसमोर दाखल हरकती विचारात घेऊन दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यानंतर विकास आराखडा जाहीर होईल. असे नगरविकास विभागाच्या तज्ज्ञ समितीने सांगितले.

दरम्यान, या प्रारूप विकास आराखड्याला उच्च न्यायालयात जामखेड शहर विकास आराखडा समिती आव्हान देणार आहे. जामखेड शहर प्रारूप विकास आराखडा जानेवारी महिन्यात नगरपरिषदेने प्रसिद्ध केला होता. नगरपरिषदेकडे हरकती दाखल केल्या होत्या.

एप्रिल, मे महिन्यात लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागल्याने या हरकतीवर सुनावणी लांबणीवर पडली जामखेड येथे प्रारूप आराखड्याबाबत हरकती दाखल करताना नागरिक होती.

आचारसंहिता उठताच नगररचना संचालक पूनम पंडित यांनी हरकतीवर सुनावणी घेण्यासाठी नगरपरिषद स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने तज्ज्ञ व्यक्तीची समिती नियुक्त करण्याबाबत ठराव करण्यास सांगितले. त्यानुसार सहायक संचालक नगररचनाकार निवृत्त संतोष धोंगडे, निवृत्त नगररचनाकार अनंत धामणे व परवानाधारक अभियंता किरण वाघ यांची निवड सहायक संचालक पूनम पंडित यांनी केली.

शहर विकास आराखडा समितीने सदर प्रारूप विकास आराखडा रद्द करावा या मागणीसाठी सोमवारी (दि.२६) तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. मंगळवारी (दि. २७) जामखेड कडकडीत बंद पाळण्यात आला होता. सदर त्रिसदस्यीय नियोजन समिती बुधवारी (दि.२८) जामखेड येथील तहसील कार्यालयातील सभागृहात आली असता पहिल्या दिवशी २३५ हरकती दाखल केल्या. गुरुवारी (दि.२९) २३० हरकती दाखल झाल्या.

यासाठी जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव कृती समिती तयार तयार करण्यात आली आहे. ती
पुढील प्रमाणे तयार करण्यात आली आहे. प्रा. मधुकर आबा राळेभात (अध्यक्ष), आकाश दिलीपशेठ बाफना(कार्याध्यक्ष), ॲड.शमा हाजी काझी साहेब (उपाध्यक्ष ), अमित अरुणशेठ चिंतामणी (उपाध्यक्ष), विनायक विठ्ठलराव राऊत
(सचिव), राहुल अंकुश उगले (सहसचिव), अविनाश दशरथ साळुंके (खजिनदार), अमोल रमेश गिरमे (समन्वयक), सन्मानीय सदस्य अशोक जावळे, डॉ.संजय राऊत, राजेंद्र देशपांडे सय्यद जावेद अली, विजय गव्हाणे हे जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव कृती समितीत आहेत.

नियोजन समिती तज्ञ सदस्य नावे पुढीलप्रमाणे होते.
संतोष दत्तात्रय धोंगडे- सहायक संचालक, नगर रचना (सेवानिवृत्त) नगर, अनंत त्र्यंबक धामणे –
रचना (सेवानिवृत्त) नगर, किरण रामचंद्र वाघे – परवाना धारक अभियंता, नितीन पाटील प्रशासक – प्रशासक, जामखेड नगरपरिषद तथा उपविभागीय अधिकारी, कर्जत भाग, कर्जत

आराखड्यातील या मुद्यांवर चर्चा….

जामखेड शहरातून सध्या ५४८ डी या राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू असून या रस्त्याच्या मध्यभागीपासून दोन्ही बाजूला १४ मीटर, असा २८ मीटरचा रस्ता, रस्ता दुभाजक, गटार, पाणीपुरवठा योजना पाईपलाईन व नगरपरिषदेची गटार, अशी कामे होणार आहेत. आता शहराच्या प्रारूप विकास आराखड्यात ४५ मीटरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील अनेक इमारती, धार्मिक स्थळे हटवावी लागणार आहेत. नुकसानधारकांना भरपाई मिळणार आहे की नाही, हा प्रश्न गुलदस्त्यात आहे.रोड होणार असल्याचे प्रारूप मध्यभागातून एक किमी अंतरावर रिंग आराखड्यात नमूद आहे. रिंगरोड शहरापासून तीन किमी अंतरावरून घ्यावा, अशी मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here