जामखेड तालुक्यातील शहीद जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

0
1436

 जामखेड न्युज——

जामखेड तालुक्यातील शहीद जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

 

जामखेड तालुक्यातील घोडेगाव येथील जवान संतोष भोंडवे शहीद घोडेगाव येथे मानवंदना देऊन
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.


जामखेड तालुक्यातील घोडेगाव येथील सैनिक संतोष कल्याण भोंडवे (वय ४०) यांचे रविवारी पहाटे पाच वाजता जामखेड येथील खाजगी दवाखान्यात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा, एक मुलगी, आई वडील असा परिवार आहे. रविवारी सायंकाळी चार वाजता घोडेगाव येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


यावेळी अहमदनगर पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. जामखेड तालुक्यातील घोडेगाव येथील संतोष कल्याण भोंडवे हे २००९ साली सैन्यातील बॉर्डर आँफ आँर्गनायझेशन मध्ये भरती झाले. सैनिकांसाठी डोंगरदऱ्यात रस्ते करण्यासाठी नियुक्ती झाली व आता ते चालक म्हणून अरूणाचल प्रदेश येथे काम करत होते.

घोडेगाव (जामखेड) येथे गावी येण्यासाठी त्यांनी रजा टाकली. अरूणाचल प्रदेश येथून रेल्वेने येत असताना दि. ११ डिसेंबर २०२३ रोजी इगतपुरी येथे रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वेतून पडले व त्यांचा अपघात झाला.

 

अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना पुणे येथे तीन महिने उपचार घेतले व गावी घोडेगाव येथे गावी आणले पण तेंव्हापासून ते बिछान्यावर होते.
दि.१६ रोजी हृदयविकाराचा झटका आला व त्यांना पुन्हा येथे उपचारासाठी पाठवले परंतु औषधो उपचारास साथ दिली नाही त्यामुळे त्यांना जामखेड येथील खाजगी दवाखान्यात दोन दिवसापूर्वी आणले परंतु रवीवारी पहाटे पाचच्या सुमारास त्यांचे निधन झाले.

जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर घोडेगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यासाठी आणले. यावेळी तहसीलदार गणेश माळी व अहमदनगर येथून पोलीस दलाच्या आलेल तुकडीने अखेरची मानवंदना दिली. यावेळी जामखेड तालुक्यातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here