जामखेड नगरपरिषद प्रारूप विकास आराखडा बचाव कृती समितीच्या वतीने उपोषण व धरणे आंदोलन सुरू, उद्या जामखेड बंद

0
988

जामखेड न्युज——

जामखेड नगरपरिषद प्रारूप विकास आराखडा बचाव कृती समितीच्या वतीने उपोषण व धरणे आंदोलन सुरू, उद्या जामखेड बंद

जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव कृती समितीच्या वतीने “चला जामखेड वाचवू या “
या टँगलाईन खाली जर प्रारूप विकास आराखडा
अन्यायकारक प्रारूप विकास आराखडा हाणून पाडा म्हणत विकास आराखडा बचाव कृती समितीच्या वतीने आज तहसील कार्यालयासमोर उपोषण व धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. उद्या जामखेड बंदची हाक देण्यात आली आहे.

जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव कृती समिती तयार पुढील प्रमाणे तयार करण्यात आली आहे. प्रा. मधुकर आबा राळेभात (अध्यक्ष), आकाश दिलीपशेठ बाफना(कार्याध्यक्ष), ॲड.शमा हाजी काझी साहेब (उपाध्यक्ष ), अमित अरुणशेठ चिंतामणी (उपाध्यक्ष), विनायक विठ्ठलराव राऊत (सचिव), राहुल अंकुश उगले (सहसचिव), अविनाश दशरथ साळुंके (खजिनदार), अमोल रमेश गिरमे (समन्वयक), सन्मानीय सदस्य अशोक जावळे, डॉ.संजय राऊत, राजेंद्र देशपांडे सय्यद जावेद अली, विजय गव्हाणे हे जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव कृती समितीत आहेत.

आज उपोषण व धरणे आंदोलात शहरातील कार्यकर्ते व नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जामखेड शहराचा विकास झालाच पाहिजे या दृष्टिकोनातून प्रारूप विकास आराखडा होणे अपेक्षित होते जामखेड नगरपरिषद प्रशासनाने व नगर रचना विभागाने सध्या तयार केलेला आराखडा हा शहराच्या विकासाच्या अनुषंगाने नसून जामखेड शहर भकास करण्याचा हा आराखडा आहे.

 

जामखेड शहरातील गोरगरीब, कष्टकरी, व्यापारी, नोकरदार, शेतकरी, पदवीधर सर्व क्षेत्रातील बहुसंख्य शहरवासीयांच्या विरोध असून या आराखड्या विरोधात जामखेड कर जन आंदोलन उभे करत आहेत, जामखेड शहरातील किमान १५००० लोक बाधित होत आहेत त्यांना अंधारात ठेवून नगर परिषद हा आराखडा लोकांवर लादत आहे आणि यासाठी समस्त जामखेड कर न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत त्यामुळे प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी व हा अन्यायकारक आराखडा रद्द करुन जामखेडकरांना विश्वासात घेऊन नवनियुक्त नगरपरिषद पदाधिकारी यांची निवड झाल्यावर नव्याने आराखडा बनवावा ही विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

आज सोमवार दिनांक २६ ऑगस्ट लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन वेळ सकाळी ११.३० ठिकाण तहसील कार्यालय जामखेड येथे सुरू करण्यात आले. तसेच उद्या मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट रोजी जामखेड बंद चे आवाहन करण्यात आले आहे.

 

जामखेड बचाव कृती समितीने म्हटले आहे की, नगर परिषदेचा प्रारूप विकास आराखडा बेकायदेशीर रित्या तयार झाला व तो करताना महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ च्या अनेक कलमांचा भंग केला व लोकांच्या घरावर तुळशीपत्र ठेवून त्यांना हुसकावून लावण्याचा व बेघर करण्याचा प्रयत्न नगरपरिषदेने केला व अद्याप करीत असल्याने सोमवार दिनांक 26/ 08 /2024 रोजी उपोषण व धरणे आंदोलन तर मंगळवार दिनांक 27/08/2024 रोजी जामखेड बंदचे आवाहन केले आहे.

त्यासाठी प्रारूप विकास आराखडा दुरुस्त करण्यासाठी जामखेड बचाव कृती समिती स्थापन करण्यात येऊन तिच्या तर्फे आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

 

जामखेड नगरपरिषदेने वप्रशासकांनी फक्त कलमं पुढे केली व त्यातील मुदती बुडवून लावल्यामुळे सदरचा आराखडा हा सदोष व बेकायदेशीर झाला असून तो बळजबरीने लागू करू पाहत आहे त्यासाठी जामखेड वासियांना आंदोलन करण्याची वेळ आलीअसल्याने सदर प्रारूप नगर रचना आराखडा सुधारित करावा अथवा रद्द करावा याकरीता जामखेड बचाव कृती समितीने आज सोमवार दिनांक 26/08/20024 रोजी तहसिल कार्यालय समोर धरणे व उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे. उद्या मंगळवार दिनांक 27/08/2024 रोजी जामखंड बंदची हाक देण्यात आली आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here