Thursday, February 12, 2026
Home शैक्षणिक बातम्या जामखेडच्या रोहित थोरात, अश्विनी जायभाय, दीक्षा पंडित या तीन खेळाडूंची राष्ट्रीय वुशु...

जामखेडच्या रोहित थोरात, अश्विनी जायभाय, दीक्षा पंडित या तीन खेळाडूंची राष्ट्रीय वुशु स्पर्धेसाठी निवड

0
455

जामखेड न्युज——

जामखेडच्या रोहित थोरात, अश्विनी जायभाय, दीक्षा पंडित या तीन खेळाडूंची राष्ट्रीय वुशु स्पर्धेसाठी निवड

जामखेडचे खेळाडू कु.दीक्षा पंडित,कु.अश्विनी जायभाय व रोहित थोरात यांची राष्ट्रीय वुशु स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिन्ही खेळाडू व मार्गदर्शक करणारे शिक्षक यांचे अभिनंदन होत आहे.

ऑल महाराष्ट्र वुशु असोसिएशन च्या वतीने पुणे येथे नुकतीच राज्यस्तरीय सिनियर वुशु निवड चाचणी संपन्न झाली. या निवड चाचणीमध्ये जामखेडचे खेळाडू कु.दीक्षा पंडित,अश्विनी जायभाय व रोहित थोरात यांनी प्रथम क्रमांक मिळवला. यामुळे जामखेड च्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

तिन्ही खेळाडूंची निवड उत्तराखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय सिनियर वुशु स्पर्धेसाठी झाली आहे. सर्व खेळाडू नवीन मराठी शाळा,जामखेड येथे वुशु जिल्हा संघटनेचे सचिव व आंतरराष्ट्रीय खेळाडू लक्ष्मण उदमले उपाध्यक्ष व प्रशिक्षक शाम पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली वुशु खेळाचा सराव करत आहेत.

सर्व खेळाडूंचे ऑल महाराष्ट्र वुशु संघटनेचे सचिव सोपान कटके,जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे साहेब,राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरंगे, कर्जत-जामखेड चे आमदार रोहित दादा पवार,व प्रा.राम शिंदे, मा.जि.प.सदस्य मधुकर आबा राळेभात, उमेश देशमुख, प्रशिक्षक लक्ष्मण उदमले, शाम पंडित,आबा जायगुडे यांच्यासह अनेकांनी हार्दिक अभिनंदन केले व राष्ट्रीय वुशु स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!