जामखेड न्युज——–
शंभुसूर्य मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक संतोष टेकाळे यांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार
जामखेड येथील शंभुसूर्य मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक संतोष टेकाळे यांना जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशनचा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. उद्या रविवारी २८ जुलै रोजी दुपारी चार वाजता माऊली सभागृह झोपडी कँटिंग अहमदनगर येथे विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे
श्री शंभुसूर्य मर्दानी खेळ, योग, व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेडचे संस्थापक अध्यक्ष तथा मुख्य प्रशिक्षक संतोष उर्फ बबलु भीमाशंकर टेकाळे यांना यंदाचा२०२३-२०२४, अहमदनगर जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशनमार्फत देण्यात येणारा मानाचा “जिल्हास्तरीय गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार” जाहीर झाला आहे.
गेल्या १४ वर्षांपासून बबलु टेकाळे यांनी श्री शंभुसूर्य मर्दानीखेळ, योग, मल्लखांब प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून जामखेड,आष्टी तसेच महाराष्ट्रातील विविध गावात शिवकालीन युद्धकला, योग तसेच मल्लखांब या साहसी क्रीडा प्रकाराचे अनेक मुला – मुलींना आपल्या अनेक सहकाऱ्यांच्या मदतीने मोफत प्रशिक्षण दित अनेक गुणवंत खेळाडू तयार केले आहेत.
मागील ३ वर्षांमध्ये झालेल्या शिवकालीन युद्धकला तसेच मल्लखांब मिळून राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेत संस्थेच्या विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी जवळपास ३२ पदके जिंकली आहेत
बबलु टेकाळे हे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी असुन आदरणीय गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजींच्या आदेशाने गावोगावी तरुण पिढी निर्व्यसनी, सदाचारी, बलवान, सशक्त घडावी या उद्देशाने आपल्या अनेक सहकाऱ्यांना सोबत घेऊन गेल्या अनेक वर्षांपासून अविरत कार्य करत आहेत. टेकाळे यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या पुरस्काराने आम्हाला आनंद झाला असुन आम्हा सर्वांची जबाबदारी आणखी वाढली आहे ती आम्ही चांगल्या प्रकारे पुर्ण करु. श्री शंभुसूर्य मर्दानी खेळ, योग, मल्लखांब प्रशिक्षणसंस्थेच्या माध्यमातून जामखेड तसेच देशभरातील विद्यार्थ्यांना मल्लखांब तसेच योग प्रशिक्षण देणारे अद्ययावत भव्य असे मल्लखांब व योग प्रशिक्षण केंद्र, खंडोबा वस्ती जामखेड येथे उभारत असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. व लवकरच ते सुरू करण्यात येणार आहे. अमोल निमोणकर यांनी सांगितले.