जामखेड न्युज——
जीवनात गुरूचे महत्त्व अनन्यसाधारण – उपप्राचार्य शेख
ल. ना. होशिंग कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न
आपल्याला गुरूकडून मिळालेल्या ज्ञानावरच त्या त्या क्षेत्रात सर्वोच्च पदाला पोहचता येते. त्यामुळे गुरूचे महत्त्व अनन्यसाधारण असते. आपल्या जीवनाला योग्य दिशा दर्शवणाऱ्या व मार्गदर्शन करणाऱ्या गुरुं बद्दल आदर व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जातो असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष सादिक शेख यांनी व्यक्त केले.
सोमवार दिनांक 22 जुलै 2024 रोजी ल.ना.होशिंग कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीत, सरस्वती पूजन व दीप प्रज्ज्वलनाने झाली.
त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष सादिक शेख प्रमुख अतिथी प्राचार्य एम. एल. डोंगरे, प्रा. अविनाश फलके यांचा प्रथमतः भव्य सत्कार करण्यात आला कॉलेजमधील सर्व शिक्षकांचाही विद्यार्थ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
प्राचार्य डोंगरे यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनातील गुरूंचे स्थान किती महत्त्वाचे आहे हे विद्यार्थ्यांना पटवून दिले.
शिक्षक मनोगतामध्ये प्राध्यापक सचिन वाकळे सरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक प्रा.पी. आर. पोकळे मॅडम यांनी तर आभार प्रा. व्ही के आघाव यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन झोया शेख व यशोदा क्षीरसागर या विद्यार्थिनींनी केले. या कार्यक्रमासाठी समारंभ प्रमुख प्रा. युवराज भोसले यांचे सहकार्य लाभले