जामखेड न्युज——
तेलंगशी जिल्हा परिषद शाळेची अमृता चौधरी
राज्यात प्रथम
मी ज्ञानी होणार सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेतील गुणवंतांचा तेलंगशी शाळेत सन्मान.
राजर्षी शाहू महाराज संस्था खोंदला ता.कळंब जि.धाराशिव आयोजित मी ज्ञानी होणार या सामान्य ज्ञानावर आधारित राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेतील गुणवंताचा आज जि.प.प्रा.शाळा तेलंगशी ता.जामखेड या शाळेत सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास खर्डा तेलंगशी केंद्रप्रमुख श्री.केशव (तात्या) गायकवाड साहेब,वाल्मिक जाधव,हनुमंत ढाळे,मुख्याध्यापक आनंता गायकवाड,कल्याण चौधरी,धनश्री ढाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सातवीची विद्यार्थीनी अमृता कल्याण चौधरी या विद्यार्थीनीने 50 पैकी 50 गुण घेऊन राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्यामुळे अमृतास संस्थेच्या वतीने रोख रुपये 500 व इंटीग्रेड क्लासेस लातूर यांच्या वतीने रोख रुपये 1800 असे एकूण रोख रु.2300,ट्राफी व सन्मानपञ देऊन गौरव करण्यात आला. तर दिक्षा तानाजी ढाळे, समृद्धी राजेंद्र ढाळे या शाळास्तरीय गुणवंतांचा ट्राफी व सन्मानपञ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जि.प.प्रा.केंद्र शाळा तेलंगशी शाळेस या उपक्रमात सहभाग घेतल्याबद्दल शाळेस सन्मानपञ देऊन गौरविण्यातआले.
सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात सार्थक बाजीराव पठारे या विद्यार्थ्यानेही राज्य गुणवत्ता यादीत येण्याचा बहुमान मिळविला होता.सलग दोन वर्षापासून शाळेने राज्य गुणवत्ता यादीत स्थान टिकवले आहे.
26 जून राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती पासून ते 12 जानेवारी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंती पर्यंत हा उपक्रम दररोज घेण्यात येतो.दररोज सामान्य ज्ञानावर आधारित पाच दर्जेदार प्रश्न देऊन प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी परीक्षा घेतली जाते.यासाठी संस्थेचे सदस्य सचिन लांडगे सर हे प्रश्ननिर्मितीचे कार्य करतात. उपक्रमातून विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान वृंद्धिगत होऊन अभ्यासात सातत्य राहते व वाचनाची आवड तयार होते. विविध स्पर्धा परीक्षेची तयारी होण्यासही मदत होते.
सर्व गुणवंत विद्यार्थी,पालक व शिक्षक यांचे जामखेड तालुक्याचे गटविकासअधिकारी प्रकाश पोळ,ज्ञमाध्यमिक उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे,गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, विस्तार अधिकारी संजय नरवडे, केंद्रप्रमुख केशव गायकवाड, संस्थेचे अध्यक्ष सचिन लांडगे सर, सचिव गणेश नागरगोजे, तेलंगशी सरपंच कविता ढाळे, शाळा व्यवस्थापन समिती यांच्यासह पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.
या उपक्रमासाठी मुख्याध्यापक आनंद राऊत, आनंता गायकवाड, संतोष गोरे,सुशेन चेंटमपल्ले, विजयकुमार रेणुके, लक्ष्मी जायभाय, अशोक जाधव व रविंद्र धस या शिक्षकांनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.