Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस, अनेकांच्या घरात पाणी, काही परिसराचा संपर्क तुटला...

जामखेड परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस, अनेकांच्या घरात पाणी, काही परिसराचा संपर्क तुटला होता

0
4528

जामखेड न्युज——

जामखेड परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस, अनेकांच्या घरात पाणी, काही परिसराचा संपर्क तुटला होता

 

जामखेड परिसरात सायंकाळी सात वाजता आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ केली. शहरातील शिवाजीनगर, संभाजीनगर परिसराचा दोन तास संपर्क तुटला होता. तसेच परिसरातील अनेकांच्या घरात पाणी शिरले होते.

तालुक्यातील दोन नंबर चा तलाव मोहरी कालच्या पावसाचे ओसंडून वाहू लागला. त्यामुळे कौतुकानदीला पुर आला होता, पैठण पंढरपूर मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. तसेच फक्राबाद येथील विचरणा नदीला पुर आल्याने धानोरा फक्राबाद पुलावरून पाणी वाहत होते वाहतूक ठप्प झाली होती.

परिसरात काल मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची पीके पाण्याखाली गेले आहेत. पीके कोवळी असल्याने सडून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

साकत, खर्डा, मोहरी, दिघोळ, जातेगाव, जामखेड, फक्राबाद, धानोरा परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने परीसरातील नद्यांना, ओढ्यांना पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या अनेक दिवसात जुलै महिन्यातच प्रथमच अनेक तलाव भरले आहेत तर नद्या. ओढ्यांना पूर आला आहे.

जामखेड शहरात कालच्या पावसाचे शिवाजीनगर व संभाजीनगर परिसराचा संपर्क तुटला होता. कोणत्याच रस्त्याने या भागात जाण्यासाठी रस्ता नव्हता रस्त्यावर कमरेपर्यंत पाणी वाहत होते. अनेकांना आपापल्या गाड्या बाहेरच लावून रात्री अकरा वाजता घरी जावे लागले.

सध्या जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. गटाराचे काही ठिकाणी काम झाले आहे तर काही ठिकाणी सुरू आहे. गटाराची साफसफाई नसल्याने अनेक ठिकाणी गटारे तुंबलेली होती. त्यामुळे रस्त्यावर पाणी येत होते. बीड रोडवर पण सगळीकडे पाणीच पाणी होते. या रस्त्यावर पाणी चालवता येत नव्हती.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!