जामखेड न्युज——
नायगाव ची केळी चालली इराणला
गणेश उगले यांची आधुनिक पद्धतीने केली लागवड
जामखेड तालुक्यातील नायगाव येथील शेतकरी गणेश उगले यांनी नायगाव येथे सत्तर गंठे क्षेत्रावर आधुनिक पद्धतीने जैन जी – 9 या वाणाची लागवड केली केळी बहारदार आली. यामुळे परिसरातील व्यापारी केळी पाहण्यासाठी येऊ लागले. व्यापाऱ्यांच्या सहकार्याने परदेशात पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार केळी इराणला पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
सत्तर गंठ्यात सुमारे पंचेचाळीस ते पन्नास टन उत्पादन होईल आठरा रूपये भाव मिळत आहे. यानुसार सुमारे आठ ते नऊ लाख रुपये मिळणार आहेत. केळी इराणला पाठविण्यात आली यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद, भाजपा प्रसिद्धी प्रमुख सुनील यादव, मंगेश वारे, केळी उत्पादक शेतकरी गणेश उगले यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
केळी परदेशात विक्रीसाठी चालली आहे. सध्या केळीचे स्थानिक बाजारभाव ढासळले आहेत.असे असले तरी परदेशात केळीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी केळी एक्सपोर्ट करणाऱ्या व्यापाऱ्यास दिल्यास स्थानिक भाव उतरला तरी केळी पीक परवडते असे उगले यांनी सांगितले.
आगोदर ऊस पीक घेत होतोत. मात्र यामध्ये अनेक अडचणी आहेत. यामुळे केळी उत्पादन घेत आहोत पिकाला पाण्यासाठी शेततळे व विहीर याद्वारे पाणी देतोत.