जामखेड न्युज——
पितृछत्र हरवलेल्या विद्यार्थ्यांना अभियंत्यांकडून शालेय साहित्यांचा आधार
मनोज जरांगे यांच्या आंदोलनात आघाडीवर असलेल्या अभियंत्यांनी विद्यार्थ्यांना मदत करून सामाजिक कार्यातही आघाडी घेतली आहे. सोनेगाव (सावरगाव) ता. पाटोदा जि. बीड येथील चार अभियंत्यांनी पितृछत्र हरवलेल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन नवीन पायंडा सुरू केला आहे. सोनेगाव येथील संभाजी चौरे, विजय चौरे, भालचंद्र चौरे, श्रीहरी चौरे हे तरुण अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले आहे. त्यांच्या या सामाजिक उपक्रमामुळे त्यांचे कौतुक होत आहे.
अभियंत्यांनी केलेल्या मदतीमुळे निश्चितच पितृछत्र हरवलेल्या मुलांना शैक्षणिक साहित्यांचा आधार मिळाला आहे. यामुळे या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी फायदा होणार आहे.
पुढील गरजु विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
१. शिवदास निरंजन चौरे
२. श्रद्धा निरंजन चौरे
३. आकांशा निरंजन चौरे
४. सिद्धी संभाजी चौरे
५. समर्थ विकास पवळ
६. तेजस विकास पवळ
७. विजय सोनवणे यांचे २ मुले
वरील सर्व विद्यार्थांना शैक्षणिक कामासाठी लागणारे सर्व साहित्य मोफत देण्यात आले.
यामध्ये वही, पेन, पुस्तके, दप्तर व शाळेचा गणवेश (गरजेचे सर्व) देण्यात आले यामुळे विद्यार्थ्यांना साहित्य मिळाले आहे. गावातील सुशिक्षित बांधवांनी अशा गरीब विद्यार्थ्यांना मदत करावी अस
आवाहन करण्यात आले आहे.
इंजी. संभाजी चौरे पाटील, इंजी. विजय चौरे पाटील, इंजी. भालचंद्र चौरे पाटील, इंजी श्रीहरी चौरे पाटील यांचे वतीने हे सर्व शालेय साहित्य मोफत वाटण्यात आले.
एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ –
संत तुकाराम महाराजांच्या सुंदर वचनाप्रमाणे गरजूंना आपणाकडून जे जे शक्य होईल ती ती मदत आपण केली पाहिजे. असे आवाहन या सुशिक्षित तरूणांनी केले आहे.