खासदार निलेश लंके गुंडाच्या दारात गुंड गजा मारणे कोण? माहीतच नव्हते… खासदार निलेश लंके यांचा दावा

0
1263

जामखेड न्युज——

खासदार निलेश लंके गुंडाच्या दारात

गुंड गजा मारणे कोण? माहीतच नव्हते… खासदार निलेश लंके यांचा दावा

 

पुणे शहरातील कुख्यात गुंड गजा मारणे याची भेट घेणे अन् त्याच्याकडून सत्कार स्वीकरण्याचा प्रकार खासदार निलेश लंके यांच्या चांगलाच अंगलट आला आहे. त्या प्रकारानंतर अडचणीत आलेल्या खासदार निलेश लंके यांनी गुंड गजा मारणे कोण होता, हे माहीत नव्हते. कळत न कळत माझ्याकडून चूक झाली, अशी भूमिका जामखेड न्युजशी बोलताना व्यक्त केली.

गुंड गजानन मारणे याने नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचा सत्कार केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निलेश लंके यांच्यावर घणाघाती हल्ला करण्यात आला. त्याला निलेश लंके यांनी उत्तर दिले.


काय म्हणाले निलेश लंके

मी दिल्लीवरुन आलो. माझे पवार नावाचे सहकारी होते. त्यांचे कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. त्यांच्या नातेवाईकांची भेट झाल्यानंतर आम्ही परत निघालो. त्यावेळी त्या भागातील आमचा राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी प्रविण धनवे यांच्या घरी गेलो. त्याच्या घरुन निघाल्यानंतर मारणे यांच्या घराजवळ आम्हाला चार सहा लोकांनी थांबवले. त्यांनी चहा पिण्यासाठी बोलवले.

आम्हाला तोपर्यंत कोणाची काहीच पार्श्वभूमी माहीत नव्हती. त्यावेळी माझा सत्कार करण्यात आला. तोपर्यंत गजानन मारणे कोण हे मला माहीत नव्हते. नंतर दोन तासांनी संबंधित व्यक्ती माहिती कळाली. तो एक अपघात होतो. कळत न कळत चूक झाली.

मतदार संघात गुंड प्रवृत्तीचे कोणीच नाही
अजित पवार गटाकडून टीका होत आहे, त्यावर बोलताना निलेश लंके म्हणाले, टीका करणे हे त्यांचे कामच आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले पाहिजे. गजा मारणे कोण होता, हे मला माहीत नव्हते. मला त्या व्यक्तीची ओळखच नाही. माझ्या मतदार संघात एक गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती नाही, त्यामुळे निवडणुकीत गजा मारणेची मदत झाल्याचा प्रश्नच येत नाही, असे खासदार निलेश लंके यांनी म्हटले आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here